‘सूर्यवंशम’ – सर्वाधिक पाहिला गेलेला भारतीय चित्रपट!

२५ वर्षांत असंख्य वेळा पुनःप्रसारण

    दिनांक :21-Apr-2025
Total Views |
sooryavansham movie भारतीय चित्रपटसृष्टीत ‘शोले’ हा चित्रपट आजही ऐतिहासिक मानला जातो. भारतात २० कोटींपेक्षा जास्त आणि परदेशात लाखो तिकिटांची विक्री होऊन, तो एक अजरामर ब्लॉकबस्टर ठरला. मात्र, केबल टीव्ही आणि इंटरनेटच्या युगात चित्रपट पाहण्याची पद्धत बदलली आणि ‘सर्वाधिक पाहिलेला चित्रपट’ याचे मोजमाप TRP, स्ट्रीमिंग मिनिटे आणि YouTube व्यूजच्या आधारे होऊ लागले.
 
 

sooryavansham movie  
या नव्या मोजमापांमध्ये एक वेगळाच चित्रपट पुढे आला – ‘सूर्यवंशम’. होय, सोनी मॅक्सवर अनगिनत वेळा प्रसारित झालेला आणि YouTubeवर कोट्यवधी वेळा पाहिला गेलेला अमिताभ बच्चन यांचा ‘सूर्यवंशम’ आता भारतातील सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट बनला आहे.१९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवंशम’ला सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. फक्त ₹१२.६५ कोटींची कमाई करत, तो बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला होता. भारतात केवळ ४० लाख तिकिटांची विक्री झाली होती. मात्र, या चित्रपटाने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवली ती त्याच्या सॅटेलाइट प्रीमियरनंतर.
 
 
व्ह्यूजचा अंदाज १०० कोटींच्या घरात
 
 
सोनी मॅक्स sooryavansham movie वाहिनीवर ‘सूर्यवंशम’ने गेल्या २५ वर्षांत असंख्य वेळा पुनःप्रसारण अनुभवले. BARCच्या आकडेवारीनुसार, २०१७ अखेर या चित्रपटाला ४.४ दशलक्ष इम्प्रेशन्स मिळाले होते. काही तज्ज्ञांच्या मते, टीव्हीवर हा चित्रपट २५-३० कोटी किंवा त्याहून अधिक प्रेक्षकांनी पाहिला असण्याची शक्यता आहे. Amazon Prime Video वरदेखील तो उपलब्ध आहे.याशिवाय, या चित्रपटाला यूट्यूबवर तब्बल ७० कोटी व्यूज मिळाले आहेत. ‘गोल्डमाइन्स एंटरटेनमेंट’ने आपल्या तीन चॅनेल्सवर हा चित्रपट अधिकृतपणे अपलोड केला असून, या तिन्ही चॅनेल्सवरील एकूण व्ह्यूज ७० कोटींवर गेले आहेत. एकूण टीव्ही, स्ट्रीमिंग आणि यूट्यूब प्लॅटफॉर्म्सवर मिळालेल्या व्ह्यूजचा अंदाज १०० कोटींच्या घरात आहे.
 
 
याच्या sooryavansham movie तुलनेत ‘शोले’ला यूट्यूबवर केवळ २० लाख व्ह्यूज आहेत, ‘डीडीएलजे’ला १० लाखांपेक्षा कमी, तर ‘बाहुबली: द बिगिनिंग’ला २ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.मुळात १९९७ मध्ये आलेल्या ‘सूरिया वसम’ या तमिळ चित्रपटाचा हा रिमेक होता. वडिलांच्या कडक शिस्तीखाली वाढलेल्या अशिक्षित पण आज्ञाधारक मुलाची ही कहाणी, सुरुवातीला लोकांपर्यंत पोहोचली नव्हती. पण आज, हा चित्रपट ‘कल्ट क्लासिक’ बनला असून, तुम्ही तो अजूनही Amazon Prime आणि YouTube वर मोफत पाहू शकता.