Nirav Modi देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचा मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यावसायिक नीरव मोदी याच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुमारे १३ हजार कोटी रुपयांची फसवणूक करून देशातून फरार झालेल्या या उद्योगपतीची कहाणी आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
चित्रपटाची घोषणा
विक्रम मल्होत्रा Nirav Modi यांच्या ‘अबुंडंशिया एंटरटेनमेंट’ या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची घोषणा केली असून तो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘गुल्लक’ आणि ‘बडा नाम करेंगे’ फेम पलाश वासवानी करणार आहेत. ‘फ्लॉएड: द राईज अँड फॉल ऑफ इंडियाज डायमंड मोगल, नीरव मोदी’ या पुस्तकावर आधारित असलेला हा चित्रपट नीरव मोदीच्या हिरे व्यापारातील शिखरावर पोहोचण्यापासून ते पीएनबी घोटाळ्यानंतर झालेल्या घसरणीपर्यंतचा प्रवास उलगडून दाखवेल.नीरव मोदीविरोधात भारत सरकारने ऑगस्ट २०१८ मध्ये गुन्हेगारी कट, विश्वासघात, फसवणूक, मनी लाँड्रिंग, गबन आणि करारभंग यांसारखे गंभीर आरोप लावले आहेत. त्यामुळे या चित्रपटातून केवळ त्याचा व्यक्तिगत प्रवास नव्हे, तर या घोटाळ्यामुळे भारतीय बँकिंग प्रणाली, अर्थव्यवस्था आणि राजकारणावर झालेल्या परिणामांचीही झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
चित्रपटासाठी Nirav Modi नीरव मोदीची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराची निवड अंतिम टप्प्यात असून लवकरच या प्रमुख भूमिकेची अधिकृत घोषणा होणार आहे. हा चित्रपट २०२५ च्या दुसऱ्या सहामाहीत पूर्ण होईल आणि २०२६ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.दरम्यान, अबुंडंशिया एंटरटेनमेंटने निर्मिती केलेला ‘छोरी २’ हा चित्रपट नुकताच अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला असून त्यात नुसरत भरुचा आणि सोहा अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.