प्रफुल्ल व्यास
वर्धा,
Bharatiya Janata Party भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे वारंवार पक्षश्रेष्ठी बोलतात. बर्याचदा ते सिद्धही होते. कमी वयात अगदी सामान्यातील सामान्य परिस्थितीतून माजी खासदार स्व. विजय मुडे यांचे बोट धरून भारतीय जनता पार्टीत आलेले सुनील गफाट यांनी पक्षात कमी वयात, कमी वेळात लोकसभा, विधानसभा निवडणुकीसारखी अफाट जबाबदारी सांभाळली. जिल्ह्यात नव्याने मंडळ अध्यक्षांची निवड रविवारी झाली. आता सर्वांच्या नजरा जिल्हाध्यक्षपदाकडे लागलेल्या आहेत. ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्याला नवीन जिल्हाध्यक्ष मिळणार आहे. जिल्हाध्यक्षपदासाठीची यादी वाढतीच आहे.

भारतीय जनता पार्टीत आता नव्यादमाच्यांना संधी देण्यासाठी प्रयोग सुरू झाले आहेत. मंडळ अध्यक्ष ४५ च्या वर नको असा तर ‘साठी’च्या आत जिल्हाध्यक्ष असे बंधन आल्याने अनेकांना स्वत:च्या मनाची समजूत घालावी लागणार आहे. वर्धा जिल्ह्याला भाजपा जिल्हाध्यक्षांची मोठी परंपरा लागली आहे. Bharatiya Janata Party यात भगवानजी आंबटकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. वर्धा जिल्ह्यात भाजपाचे पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून विठ्ठलराव बोरकर झाले. त्यानंतर भगवानजी आंबटकर, आ. दादाराव केचे, माजी खा. सुरेेश वाघमारे ही भाजपाच्या पठडीतील मंडळी जिल्हाध्यक्ष झाली. त्यानंतर बाहेरच्या पक्षातून आलेले हभप डॉ. नारायण निकम आणि डॉ. शिरीष गोडे यांची वर्णी लागली.
डॉ. गोडे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात भाजपाने खर्या अर्थाने कड पलटला. गावागावात भाजपा पोहोचवली. त्याच काळात सुधीर दिवे आणि डॉ. गोडे या दोघांनी काँग्रेसला पटकनी दिली. राजेश बकाने यांच्या कार्यकाळात भाजपा बहरली. पुन्हा डॉ. गोडे यांना जबाबदारी दिल्या गेली. परंतु, त्यांना भाजपात अवस्थ वाटत असल्याने त्यांनी अचानक राजिनामा दिला. गोडे यांच्या राजिनाम्यानंतर गफाट यांना एक वर्षे नंतर निवड प्रक्रीयेने दीड वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली. Bharatiya Janata Party या काळात लोकसभा आणि विधान सभेच्या निवडणुका झाल्या. आपल्या कार्यकाळात प्राथमिक सदस्य नोंदणी मोहीम यशस्वी झाली. २५ वर्षे काँग्रेसचा आमदार असलेल्या देवळी मतदार संघात भाजपाचा आमदार निवडून आला तर जिल्ह्यात ४ आमदार भाजपाचे आहेत. आपल्याच कार्यकाळात जिल्ह्याला पालकमंत्रीही जिल्ह्यातलाच मिळाल्याचे गफाट यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्षपदाकरिता कामगार नेते मिलिंद देशपांडे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, मिलिंद भेंडे, संजय गाते, प्रशांत बुर्ले, अविनाश देव यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान किशोर दिघे यांच्याही नावाची चर्चा होती. अनुसुचित जातीचा विचार केल्यास आपणही जिल्हाध्यक्षपदाचे दावेदार असल्याचे अशोक विजयकर यांनी सांगितले. Bharatiya Janata Party तर पुन्हा जबाबदारी दिल्यास आजपर्यंतच्या अनुभवाचा पक्षाला फायदाच होईल, असे गफाट म्हणाले. पाच वर्षांचा पुर्ण काळकाळ न मिळाल्याने तसेच सर्वांसोबत जुळवून घेतले जात असल्याने गफाट यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.