चेन स्नॅचिंग करणार्‍या चोरट्यांना अटक

९ गुन्हे उघडकीस, ६.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :23-Apr-2025
Total Views |
वर्धा,
Chain snatching thieves arrested विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात दुचाकीने भम्रंती करून चेन स्नॅचिंग करणार्‍या अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने अटक केली. त्यांच्याकडून ६ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वैभव अडोळे (२५) व रोह हुनकर (२२) दोन्ही रा. येरला, जि. अमरावती अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी वर्धा, नागपूर, अकोला, संभाजीनगर, जालना येथे चोरी केल्याचे सांगितले. देवरणकर ले-आउट सहकारनगर येथील महिला शेजारी महिलेसोबत बोलत असताना दुचाकीने आलेल्या दोन अज्ञात युवकांनी त्यांच्या गळ्यातील ६८ हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोफ चोरून नेला होता. तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.
 
 
p
 
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेची चमू करीत असताना दोन अनोळखी इसमाजवळ चोरीचे सोने असून ते आष्टी येथून मोर्शी चौरस्त्याकडून अंतोराकडे जात असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे मोर्शी फाट्याजवळ नाकेबंदी करून दोघांना ताब्यात घेतले. Chain snatching thieves arrested पोलिसांनी कसून विचारपूस केली असता या दोघांनी जालना येथून दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. यानंतर त्याच दुचाकीने विविध जिल्ह्यात चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. या दोघांनी त्यांचा तिसरा सहकारी राहुल वानखेडे (३३) रा. अंतोरा, जि. वर्धा यांच्यामार्फत चोरीतील मुद्देमालाची विल्हेवाट लावल्याचे सांगितले. या तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याची चेन, हार, छोटे पदक, आदी सोन्याचे दागिने आणि विनाक्रमांकाची दुचाकी, दोन मोबाइल असा ६ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
चोरटा राहुल वानखेडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर राज्यात चोरी, घरफोडी, अपहरण, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आदी गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, Chain snatching thieves arrested अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, प्रकाश लसुंदे, पोलिस अंमलदार शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, विकास मुंडे, सुगम चौधरी, अरविंद इंगोले, शुभम राऊत, राहुल अधवाल यांनी केली.