पुलगाव,
Eknath Shinde वर्धा जिल्ह्यातील उबाठा गटाचे सहसंपर्क प्रमुख रविकांत बालपांडे आणि त्यांच्या सहकार्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उबाठाचे वर्धा जिल्हा सल्लागार प्रशांत शहागडकर, जिल्हा प्रमुख श्रीकांत मिरपूरकर, जिल्हा समन्वयक दशरथ जाधव, पुलगावचे निवासी उपजिल्हा प्रमुख डॉ. निलेश गुल्हाने उपजिल्हाप्रमुख अजिंय तांबेकर, आष्टीचे तालुकाप्रमुख चंद्रशेखर नेवारे, देवळीचे उप तालुकाप्रमुख निलेश मोटधारे, आशिष वैरागडे, संदीप टिपले, विपीन काकडे, भूषण जाधव यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे विदर्भ संपर्कप्रमुख आणि आ. नरेंद्र भोंडेकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, युवासेनेचे हर्षल कदम तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.