पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार 'सैफुल्लाह'

23 Apr 2025 19:32:37
जम्मू-काश्मीर,
Pahalgam Terror Attack Mastermind Saifullah जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (२२ एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करून २५ जणांचा बळी घेतला. सद्यस्थितीत जम्मू-काश्मीर पोलीस, गुप्तचर यंत्रणा आणि संरक्षण दलाकडून या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
 
 
Pahalgam Terror Attack Mastermind Saifullah
 
 
या हल्ल्याचे रेखाचित्र व छायाचित्र सुरक्षा यंत्रणांकडून जारी करण्यात आले असून तिघा दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. त्यांची नावे आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी असून, चौथ्या दहशतवाद्याची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. काही माध्यमांनी या चौथ्या दहशतवाद्याचे नाव अबू मूसा असल्याचा दावा केला आहे, मात्र याला अद्याप शासकीय पातळीवरून दुजोरा मिळालेला नाही.दरम्यान, Pahalgam Terror Attack या भीषण हल्ल्यामागे लष्कर-ए-तैयबाचा कुख्यात कमांडर सैफुल्लाह कसुरी उर्फ खालीद उर्फ सैफुल्लाह साजिद जट्ट याचा मुख्य सहभाग असल्याचे समोर आले आहे. हा सैफुल्ला, दहशतवादी संघटना ‘दी रेजिस्टन्ट फ्रंट’शी संबंधित असून, तो हफीज सईदचा निकटवर्तीय असल्याची माहिती मिळत आहे.
 
सूत्रांनुसार, सैफुल्लाहने या हल्ल्याचा बेत काही दिवसांपूर्वी आखला होता. त्याच्या साथीदारांनी पहलगाममधील पर्यटनस्थळाची आधी पाहणी केली होती. त्यानंतर चारही दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार करत २५ निष्पाप लोकांचा बळी घेतला आणि घटनास्थळावरून पसार झाले.
 
 
अबू मूसा हल्ल्यात सहभागी?
 
‘फर्स्टपोस्ट’च्या अहवालानुसार, सैफुल्लाहला या हल्ल्यात अबू मूसा याचे सहकार्य लाभले होते. १८ एप्रिल रोजी रावलकोट येथे झालेल्या एका रॅलीत अबू मूसा सहभागी होता आणि त्याने जिहाद समर्थक उग्र भाषण केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तो म्हणाला होता, “जिहाद चालूच राहील. आपल्या बंदुका बोलतील. काश्मीरमध्ये मुंडकी छाटण्याचं काम चालूच राहील.”
 
 
सैफुल्लाह कोण आहे?
 
सैफुल्लाह Pahalgam Terror Attack Mastermind Saifullah  कसुरी हा लष्कर-ए-तैयबाच्या एका टोळीचा कमांडर असून, तो बराच काळ पाकिस्तानमध्ये वास्तव्यास होता. तो पाक लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत अनेकदा दिसला आहे. हल्ल्याच्या दोन महिने आधी तो पाकिस्तानमधील कंगनपूरला गेला होता, जिथे पाकिस्तानी सैन्याची मोठी बटालियन तळ ठोकून आहे.
Powered By Sangraha 9.0