भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ पुलगावात निषेध मोर्चा

23 Apr 2025 21:03:29
पुलगाव,
Protest march in Pulgaon पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्याचा निषेधार्थ पुलगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहर अध्यक्ष प्रशांत इंगोले यांच्या नेतृत्वात आज २३ रोजी निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना प्रशांत इंगोले यांनी हल्लेखोरांवर करवाईची मागणी केली. कपिल शुला यांनी जे लोक पर्यटक म्हणून तेथे गेले त्याचे धर्म विचारून त्याना त्यांचा पत्नी व मुलाबाळा समोर गोळी झाडून अमानुष रित्या मारणार्‍या कृत्यचा निषेध केला.
 
 
l
 
आतंकवाद्यांना निवडून निवडून मारावे जेणे करुन पुन्हा पाकिस्तान अश्या प्रकारे हल्ला करण्याची हिम्मत करणार नाही या मागणीचे निवेदन नायब तहसिलदारांमार्फत पंतप्रधानांना पाठवण्यात आले. Protest march in Pulgaon या प्रसंगी राजू जयस्वाल, सुरेश सुखीजा, राजेश पनपालिया, मंगेश झाडे, विशाल धोपडे, सुनील बैस, अनिलसिंग चौहान, अली असगर सैफी, आकाश दुबे, अनिल लेकुरवाडे, गजू चंदेल, सुरज सुरस्कार, गुंजन चौहान, सुरज पुरेकर, प्रशांत गायकवाड सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0