उद्या आकाशात जाणवेल हसरा चेहरा

चंद्र, शुक्र, शनीची दुर्मिळ युती दिसणार

    दिनांक :23-Apr-2025
Total Views |
आर्वी, 
Smiley Face in Sky ब्रम्हांडरुपी आकाशात २५ रोजी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि रोमांचक गोष्ट दिसणार आहे. जगातील खगोल निरीक्षकांना आकाशात एक अदभूत आणि नेत्रदीपक असा अद्वितीय दुश्य प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. आकाशात ट्रिपल प्लँनेटरी कंजशन म्हणजे दोन विशाल ग्रह व एक उपग्रह या तिघांचा संयोग घडणार आहेत. त्यामुळे आकाशात एक हसणारा चेहरा दिसणार आहेत.
 
 
p
 
या दुर्मिळ ग्रह संयोगात शुक्र, शनी आणि चंद्र एकत्र दिसणार आहेत. या नेत्रदीपक दुश्याचा आनंद कोणत्याही ठिकाणावरून घेता येईल. Smiley Face in Sky हा ग्रह संयोग तेव्हा होतो जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक अंतराळातील घपे एकमेकांच्या अतिशय जवळ असतात आणि त्यामुळे ते आपल्याला एकत्र दिसतात. जेव्हा तीन ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्याला अवकाशीय भाषेत ट्रिपल प्लँनेटरी कंजशन म्हणतात.
 
विशेष म्हणजे २५ रोजी शनी, शुक्र आणि चंद्र या तीन अंतराळ पिंडाचा संयोग होणार आहेत. यामुळे एक वैशिष्ट्यपूर्ण आकृर्ती आकाशात तयार होईल. अर्थातच जी हसणार्‍या चेहर्‍याचे रुप धारण करेल. २५ रोजी सुर्योदयापुर्वी शुक्र आणि शनी ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ दिसतील. Smiley Face in Sky तसेच शुक्र आणि शनी हे ग्रह मानवी चेहर्‍यावरील डोळ्याच्या रुपात भासतील आणि त्यांच्या खाली चंद्र हा अर्धचंद्र रूपात तोंडासारखे मुख म्हणून दिसून येणार आहेत. म्हणजेच या रचनेतुन एक हसणारा चेहरा तयार होईल.
 
२५ रोजी सकाळी पुर्वेकडील आकाशात सुर्योदयाच्या एक तासभर आधी हा विलोभनीय नजराणा दिसणार आहेत. या संयोगाचे निरीक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या आकाशीय, उपकरणांची आवश्यकता राहणार नाही. तद्वतच शुक्र आणि शनी प्रखरपणे दिसतील. Smiley Face in Sky अधिक स्पष्ट पणे पाहण्यासाठी चांगली दुर्बीण किंवा बियनाँयुलर उपयोगी पडू शकतो. या संयोगाचे सर्वोत्तम दुश्य सुर्योदयापुर्वीच्या एका तासात आपल्याला मिळू शकते. तसेच जर आकाश निरभ्र असेल तर बुध ग्रह देखील तिसर्‍या चमकणार्‍या पिंडाच्या खाली दिसु शकतो. त्यामुळे अंतराळ क्षेत्राची विशेष आवड असणार्‍या विद्यार्थ्यांनीही हे विलोभनीय दुश्य पाहायला हवे, असे आवाहन अविनाश टाके यांनी केले आहे.