सजवा बाग हिरव्या स्वप्नांनी, उन्हातही निसर्गाच्या छायांनी!”

करा असे काही उपाय

    दिनांक :23-Apr-2025
Total Views |
summer उन्हाळा म्हणजे तप्त सूर्यकिरणांचा, कडाक्याच्या उष्णतेचा आणि कोरड्या वातावरणाचा काळ. माणसांप्रमाणेच निसर्गातील इतर घटकांनाही या ऋतूचा मोठा फटका बसतो. विशेषतः झाडांसाठी उन्हाळा ही एक परीक्षा ठरते. त्यामुळे या काळात झाडांचे योग्य प्रकारे संगोपन करणे गरजेचे असते.
 
 

Tree care in summer 
 
झाडांना summer उन्हाळ्यात सर्वात मोठा त्रास होतो तो म्हणजे पाण्याच्या कमतरतेचा. दिवसेंदिवस वाढणारे तापमान, कमी होणारे पावसाचे प्रमाण आणि भूमीतील ओलावा कमी होणे यामुळे झाडांची वाढ खुंटते, पाने गळतात आणि काही वेळा झाडे सुकून जातात. म्हणूनच त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.सर्वप्रथम झाडांना नियमित पाणी देणे अत्यंत आवश्यक असते. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर झाडांना पाणी दिल्यास ते मुळांपर्यंत जाते आणि वाफरून जात नाही. मोठ्या झाडांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा खोलवर पाणी द्यावे, तर लहान रोपांना रोज थोडेसे पाणी देणे गरजेचे आहे.
 
 
१. झाडांना थंडावा – पाणी व्यवस्थापन
सकाळी लवकर किंवा संध्याकाळी झाडांना पाणी द्यावे.
मुळाजवळ पाणी घालणे फायदेशीर ठरते.
मातीवर पालापाचोळा किंवा गवत पसरवून मल्चिंग केल्यास मातीतील आर्द्रता टिकते.
 
 
२. झाडांना सावली – उन्हापासून संरक्षण
कुंड्यांतील झाडे ग्रीन नेटखाली ठेवा.
मोठ्या झाडांची सावली लहान झाडांसाठी वापरता येते.
प्लास्टिकच्या किव्हा लोखंडी स्टँडवर झाडे ठेवून त्यांच्यावर आच्छादन द्या.
 
 

३. सजावट – सौंदर्य आणि हरितपणा
रंगीत कुंड्या, लटकत्या भांड्यांचा वापर करा.
भिंतींवर वॉल-प्लांट्स लावा.
बोगनवेल, झेंडू, पोर्टुलुका यांसारखी उन्हात तग धरू शकणारी फुलझाडे निवडा.
कुंड्यांना रंग देऊन त्यांचा सौंदर्यवाढवणारा लूक तयार करा.
 
 
४. पोषण आणि खत – झाडांची ताजेपणा
उन्हाळ्यात द्रवखतांचा (liquid fertilizer) वापर लाभदायक.
जैविक खतांचा वापर करा.
महिन्यातून एकदा झाडांच्या पानांवर पाण्याचा शिंपडका द्या.
 
 
५. छाटणी आणि स्वच्छता
कोरडे व रोगट भाग कापून टाका.
झाडांची वेळोवेळी छाटणी केल्यास त्यांची वाढ नीट होते.
झाडांच्या भोवतीची जागा स्वच्छ ठेवा.
 
 
गचपण Mulching हा एक उत्तम उपाय आहे. झाडांच्या मुळाभोवती सुकलेली पाने, गवत, शेणखत किंवा लाकडाचा भुका पसरवल्यास मातीतील ओलावा टिकतो आणि तापमानाचा झाडांवर परिणाम कमी होतो. यामुळे मुळे थंड राहतात आणि झाडे ताजीतवानी दिसतात.अनेक वेळा उष्णतेचा झळा लहान रोपांना जास्त त्रासदायक ठरतो. अशा वेळी त्यांना छत्री हरितजाळी green net किंवा कापड लावून सावली द्यावी. ही सावली सूर्यकिरणांची तीव्रता झपाट्याने कमी करते आणि झाडांचे नुकसान टाळते.साथच, उन्हाळ्यात झाडांची प्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे फायद्याचे ठरते. कंपोस्ट खत, गांडूळ खत किंवा शेणखत यांचा वापर केल्यास झाडांना आवश्यक पोषण मिळते आणि त्यांची वाढही सशक्त होते.अखेर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे झाडांची नियमित देखभाल. सुकलेली पाने, फांद्या कापून टाकाव्यात. कीड आणि रोगांचा त्रास झाल्यास नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करावा.
 
 
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा प्रेमाने आणि summer काळजीने झाडांकडे पाहिलं, तर तीही घराचा एक भाग होऊन तुमचं आयुष्य हिरवंगार करतात!आजच्या काळात झाडांचे संगोपन म्हणजे केवळ पर्यावरणासाठी नव्हे, तर आपल्या भविष्याचीही सुरक्षितता आहे. उन्हाळ्यात त्यांच्या देखभालीने आपण निसर्गाशी असलेले नाते अधिक घट्ट करू शकतो.