Urad dal vadi उन्हाळा आला, की घराघरात वाळवणींची लगबग सुरू होते. लोणची, पापड, कुरडया यांच्यासह अजून एक पारंपरिक पदार्थ म्हणजे उद्दाच्या वड्या. या वड्या वर्षभर टिकतात आणि खास चवदार भाजी नसली, तरी या वड्यांची चव जेवणात भर घालते.
उद्दाच्या Urad dal vadi वड्या बनवणे ही एक संयम आणि मेहनतीची कला आहे. यासाठी लागणारी तयारी, योग्य हवामान, आणि घरातील सगळ्यांचा सहभाग यामुळे हा एक कौटुंबिक उपक्रम ठरतो. वड्या केवळ चविष्ट नसतात, तर पचनास हलक्या आणि प्रथिनांनी भरपूर असल्यामुळे आरोग्यासाठीही उपयुक्त असतात.खास करून ग्रामीण भागात आजही या वड्या पारंपरिक पद्धतीने केल्या जातात. शहरातही काही कुटुंबे हा वारसा जपताना दिसतात. उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर प्रकाशाचा उपयोग करत वर्षभरासाठी असा साठा तयार केला जातो. आजच्या धावपळीच्या जीवनात हा प्रकार थोडा मागे पडला असला, तरी पारंपरिक चव आणि आपुलकीच्या आठवणी जपण्यासाठी उद्दाच्या वड्या अजूनही महत्त्वाच्या ठरतात.
उद्दाच्या वड्यांची रेसिपी Urad dal vadi (पारंपरिक पद्धतीने)
साहित्य
उडीद डाळ – १ किलो
हिरव्या मिरच्या – १०-१२ (चवीनुसार)
आले – १ मोठा तुकडा
हिंग – १ छोटा चमचा
मीठ – चवीनुसार
तेल – १ चमचा (आवश्यकतेनुसार)
जिरं – २ चमचे
पाणी – भिजवण्यासाठी
कृती
1. उडीद डाळ स्वच्छ धुऊन ४-५ तास भिजवून घ्या.
2. भिजलेली डाळ थोडं पाणी निथळून मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्या. वाटताना पाणी कमीच वापरा.
3. मिरच्या, आले, जिरं हे सुद्धा वाटून त्यात मिसळा.
4. आता या मिश्रणात हिंग, मीठ आणि थोडंसं तेल घालून नीट फेटून घ्या. मिश्रण एकजीव आणि थोडं हलकं लागायला हवं.
5. एका स्वच्छ प्लास्टिकच्या शीटवर किंवा कापडावर छोटे छोटे गोळे टाकत वड्या लावा.
6. त्या उन्हात ३-४ दिवस वाळवाव्यात. दररोज उलटसुलट करून वड्या नीट वाळतील याची काळजी घ्या.
7. पूर्ण वाळल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
वापर कसा करावा?
या Urad dal vadi वड्या तेलात खरपूस तळून भातासोबत खायला अतिशय चविष्ट लागतात.
कधी कधी त्यात कांदा, टोमॅटो, मसाले घालून वड्यांची भाजीही करता येते.