Summer farming उन्हाळ्याचे चटके वाढू लागल्याने शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. पाण्याचा तुटवडा, वाढलेला तापमान आणि ओलाव्याचा अभाव यामुळे पीक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना राबवून उत्पादन टिकवणे गरजेचे ठरत आहे.विदर्भातील उष्ण हवामान, उन्हाळ्यात वाढणारे तापमान आणि पावसाळ्यापूर्वी पाण्याचा तुटवडा यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते. विशेषतः अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांत उन्हाळी हंगामात सिंचनाचा प्रश्न गंभीर होतो. अशा वेळी शाश्वत शेतीसाठी खालील उपाय फायदेशीर ठरू शकतात
१. ठिबक सिंचनाचा अवलंब करा
पाण्याचा Summer farming कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळवण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत उपयुक्त ठरते. या पद्धतीने पाणी थेट झाडांच्या मुळाशी पोहोचते व वाया जात नाही.विदर्भातील अनेक भागांमध्ये पाण्याचा स्रोत मर्यादित असल्याने ठिबक व तुषार सिंचन ही तंत्रे अत्यंत उपयुक्त ठरतात. विशेषतः कपाशी, टोमॅटो, मिरची, आणि भाजीपाला यांसाठी ठिबक प्रभावी आहे.
२. मल्चिंगचा वापर करा
मल्चिंग Summer farming म्हणजे प्लास्टिक किंवा सेंद्रिय आच्छादन पिकांच्या मुळाजवळ टाकणे. यामुळे जमिनीतला ओलावा टिकतो, तण वाढत नाही आणि जमिनीचे तापमान नियंत्रित राहते.विदर्भात उन्हाळ्यात जमिनीचा ओलावा टिकवणे मोठे आव्हान असते. प्लास्टिक मल्चिंग किंवा सेंद्रिय आच्छादन (सडलेले गवत, पालापाचोळा) यामुळे जमिनीतील ओलावा टिकतो आणि तणवाढ नियंत्रणात राहते.मूग, तीळ, उडीद, सूर्यफूल, कडधान्ये व काही भाजीपाला (काकडी, दोडका) ही पीके कमी पाण्यावर तग धरतात. ही पीके उन्हाळी हंगामात निवडल्यास आर्थिक फायदा संभवतो.
३. सेंद्रिय खते व गोमूत्राचा वापर
रासायनिक खतांचा अतिरेक टाळून सेंद्रिय खते, शेणखत, गोमूत्र यांचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि पिकांनाही योग्य पोषण मिळते.
४. सकाळी किंवा संध्याकाळी सिंचन करा
तापमान जास्त असताना सिंचन केल्यास पाणी लगेच वाष्प होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.सरकारी योजनांतून मिळणाऱ्या अनुदानाचा वापर करून शेततळे, बंधारे, कचर कुंड्या, वॉटरशेड्स यांचा लाभ घ्यावा. विदर्भात 'जलयुक्त शिवार' योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी जलसाठे तयार करण्यात आले आहेत, त्यांचा योग्य वापर करावा.विदर्भात हवामान अतिशय चंचल असते. त्यामुळे 'मेघदूत', 'किसान सुविधा' अशा अॅप्सद्वारे हवामानाचे अपडेट घ्या. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होऊन नैसर्गिक संकटाच्या वेळी आर्थिक सुरक्षा मिळवावी.
५. स्थानिक हवामानानुसार पीक निवडा
उन्हाळ्यात उष्णता सहन करणारी पीके निवडल्यास कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळू शकते. उदा. मूग, उडीद, तीळ, सूर्यफूल इत्यादी.
६. शेतीसाठी जलसंधारणाची कामे करा
पावसाळ्यापूर्वी बांधबंदिस्ती, चर खोदाई, शेततळे आदी जलसंधारण कामे केल्यास पुढील हंगामात पाण्याचा पुरेसा साठा तयार होतो.
७. हवामानाचा अंदाज लक्षात ठेवा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कामे नियोजित केल्यास नुकसान टाळता येते. मोबाईलवर मिळणाऱ्या अॅप्स व अलर्ट्सचा वापर करावा.
८. पीक विमा योजनेचा लाभ घ्या
अनिश्चित हवामानामुळे होणाऱ्या नुकसानावर उपाय म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना उपयुक्त ठरते. वेळेत अर्ज करून विम्याचा लाभ घ्यावा.
उन्हाळ्यात योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक शहाणपण यांचा समतोल राखल्यास उत्पादनावर कोणताही परिणाम न होता नफा मिळवता येतो. शेतकऱ्यांनी आजपासूनच या उपायांचा अवलंब करावा, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.