तुम्हाला मिळाले का नाट्य संमेलनाचे निमंत्रण ?

पूर्वसंध्येला व्हाॅट्सॲपवर मिळाल्या पत्रिका

    दिनांक :24-Apr-2025
Total Views |
अनेक ज्येष्ठ रंगकर्मी रात्रीपर्यंत हाेते प्रतीक्षेत
 
पराग मगर
नागपूर,
Indian Marathi Theater Council शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विभागीय स्तरावरील नाट्य संमेलन २४ ते २७ एप्रिलदरम्यान रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयाेजित आहे. फेब्रुवारी महिन्यापासून आयाेजनाचा शंखनाद सुरू असला तरी संमेलनाचे एकंदरित स्वरूपच विलंबित ख्यालात सुरू हाेते. विशेष म्ह णजे निमंत्रण पत्रिका एक दिवसापूर्वी संमेलनाच्या पूर्वसंध्येला अनेकांना समाजमाध्यमावर मिळाल्याने ज्येष्ठ-श्रेष्ठ रंगकर्मी तुम्हाला निमंत्रण मिळाले का, असे एकमेकांना विचारत हाेते. तर काहींना रात्रीपर्यंतही पत्रिका मिळाली नसल्याचे त्यांनी तरुण भारतला सांगितले.
 
 
2
 
रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे १०० वे विभागीय नाट्य संमेलन सुरुवातीपासूनच ढिसाळ नियाेजन आणि नाराजीनाट्य यामुळे चर्चेत आहे. १५ एप्रिलला अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी नागपुरात पत्रपरिषद घेऊन तारखांची घाेषणा केली. त्यानुसार २४ एप्रिलला रात्रकालीन एकांकिका स्पर्धेने नाट्यसंमेलनाची सुरुवात हाेत आहे. Indian Marathi Theater Council परंतु २३ तारखेच्या दुपारपर्यंत कुणालाही निमंत्रण पत्रिका पाेहाेचल्या नव्हत्या. सायंकाळनंतर त्या व्हाॅट्सअ‍ॅपच्या माध्यमातून काहींना यायला सुरुवात झाली. अनेकांना त्या रात्रीपर्यंतही मिळालेल्या नसल्याचे विदर्भातील ज्ये ष्ठ रंगकर्मींनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. संमेलन उद्यावर आले असताना इतक्या उशीरा निमंत्रण पत्रिका मिळाल्याने संमेलनाला यावे तरी कसे असा प्रश्न विदर्भातील रंगकर्मींना पडला आहे. ढिसाळ नियाेजनाला हा आणखी एक नमूना असल्याचीही प्रतिक्रिया काहींनी नाेंदविली.
नियामक मंडळातील अनेकांची दांडी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळात राज्यभरातील ६० सदस्य आहेत. या सर्व सदस्यांनी संमेलनाला येणे अपेक्षित आहे. Indian Marathi Theater Council व्यवस्थेच्या दृष्टीने त्यांनी येण्याबाबत आधीच सांगणे गरजेचे असते. पण विदर्भातील उन आणि इतरही कारणे सांगून यातील जवळपास २० ते २५ सदस्यांनी येण्याबाबत नकार कळविल्याची माहिती आहे. तर काहींनी वेळेवर रिझर्वेशन कॅन्सल केल्याचेही सांगण्यात येत आहे.