हिंगणघाट,
Pahalgam Attack : हिंगणघाट येथील सायकल पोलोचे राष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विजय भांडवलकर हें सपत्नीक काश्मीर टूर वर फिरायला गेले होते.
22 एप्रिलला दुपारी हें सर्व पहेलगाम फिरून हॉटेल मध्ये पोहचले. दरम्यान टीव्ही वरील बातमी पहात असतांना बातमीतून त्यांना पहेंलगामला अतिरेक्यानी पर्यटकांवर गोळीबार झाल्याचे कळले. भांडवलकर यांनी सांगितले कीं घटना घडताच ताबोडतोब मिलिट्रीने संपूर्ण परिसर सील केला. आणि अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आम्हाला दिल्ली येथे घेऊन आले आहे. तुम्हा सर्वाचां आशिर्वादाने आम्ही सर्व आपल्या गांवाकडे परत येत आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी भावुक होऊन दिली.