अकोला,
water supply : जलशुद्धीकरण केंद्र महान येथील क्लारिफायर तसेच इतर अत्यावश्यक दुरुस्तीचे काम करण्यासाठी ६५ एमएलडी प्लांट वरून होणारा पाणीपुरवठा २, ३ व ४ मे रोजी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.उन्हाळ्याच्या दिवस असल्याने नागरिकांनी पुरेशी साठवणूक करण्याचे आवाहन मनपाने केले आहे.
शहरातील श्रद्धा नगर, केशवनगर ,आदर्श कॉलनी, नेहरू पार्क, तोष्णीवाल लेआउट, हरिहरपेठ ,लोकमान्य नगर ,जोगळेकर प्लॉट, गंगानगर, मराठी स्कूल, महाजनी प्लॉट, हिंदी स्कूल, रेल्वे स्टेशन, अकोट फाईल, उमरी, गुडधी, मलकापूर, खडकी या भागातील जलकुंभावरून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने या जलकुंभावरून शहरातील ज्या भागात पाणीपुरवठा १ मे पर्यंत होईल त्या भागातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची पुरेशी साठवणूक करावी तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा व मनपास सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे यांनी केले आहे.
या भागातील पाणीपुरवठा सुरळीत
तसेच या कालावधीमध्ये २५ एम.एल.डी. प्लांट वरून होणाऱ्या शिवनगर, आश्रय नगर, बस स्टँड, शिवनी, शिवर तसेच शिवापूर या भागातील जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहील याची संबंधीत भागातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे जलप्रदाय विभागाने कळविले आहे.