उन्हाळ्यात लग्नसराईची धूम

एसटीच्या ताफ्यात २० नवीन डिझेल बसेसची भर

    दिनांक :26-Apr-2025
Total Views |
नागपूर 
ganesh peth nagpur महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागातील अनेक बसेस जुन्या असल्याने बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशात उन्हाळ्यात लग्नसराईची धूम सुरु झाल्याने प्रवासी बसेस कमी पडत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाच्या नागपूर आगारातील ताफ्यात पुन्हा २० नवीन डिझेल बसेसची भर पडली आहे. यामुळे एसटीच्या तिजोरीतही चांगली पडणार आहे.
 
 
 
ganesh peth nagpur
 
 
आगारातून ४१४ बसेसचे संचलन
 
एसटी महामंडळाच्या ganesh peth nagpur नागपूर आगारात आठ डेपो असून सध्यस्थितीत या आगारातून ४१४ बसेसचे संचलन होते. यातील बर्‍याच बसेस बंद अवस्थेत आहे. उन्हाळ्यात विवाह कार्यक्रमासाठी बसेसची मागणी असते. नव्या बसेस नसल्याने लग्नसराईच्या उत्पन्नापासून वंचित राहाण्याची वेळ एसटी महामंडळावर येते. गणेशपेठ बसस्थानकावर सकाळपासून रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. एवढेच नव्हे तर कडक उन्हात सुध्दा अनेक बसेसमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येते.
 
 
प्रवाशांचा प्रवास आरामदायक
 
एसटी महामंडळाच्या ganesh peth nagpur नागपूर विभागाला नव्या २० नवीन डिझेल बसेस मिळाल्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायक झाला आहे. गणेशपेठ आगाराला १० गाड्या तर ५ बसेस इमामवाडा, तर ५ बसेस रामटेक आगाराला मिळाल्या आहेत. नवीन बसेस या बसेस छत्रपती संभाजीनगर, वाशिम, नांदेडसारख्या लांब पल्ल्याच्या अंतरावर प्रवाशी सेवा देण्यासाठी मदत होणार आहे. नवीन बसेसची आसन व्यवस्था आरामदायक असून सीट पूश करून सिट मागेपुढे करता येते. तसेच या गाड्यांमध्ये अलार्म सिस्टम आणि दुसर्‍याही काही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी दिली
 
 
प्रवासी वाढणार अन् उत्पन्नही
 
 
नागपूर विभागातून दररोज सुमारे दीड लाख प्रवासी प्रवास करतात. आता नवीन बसेसची त्यात भर पडल्यामुळे आणखी ८ ते १० हजार प्रवासी वाढणार आहेत. अर्थात एसटीच्या नागपूर विभागाच्या तिजोरीला त्याचा चांगला फायदा होईल.