मुंबई,
india vs pakistan पाहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा थेट सहभाग असल्याचे आता स्पष्ट होत आहे, आणि त्यामुळे संपूर्ण देशात पाकिस्तान विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध संपुष्टात येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. या मुद्द्यावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीने कडक भूमिका घेतली आहे.
गांगुलीने सरकारला india vs pakistan पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे आवाहन केले आहे. "१०० टक्के पाकिस्तानसोबतचे सर्व क्रिकेट संबंध तोडावे," असे त्याने स्पष्टपणे सांगितले. "पाकिस्तानने केलेल्या कृत्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. दहशतवाद सहन करणे आता शक्य नाही," असे गांगुलीने पुढे सांगितले.सौरव गांगुलीने २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दलही उल्लेख केला. बीसीसीआयने त्या काळात भारत आणि पाकिस्तानच्या द्विपक्षीय मालिका थांबवल्या, आणि अलिकडेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला भारत पाठवण्यास नकार दिला होता.
पर्यटकांवर गोळीबार
दरम्यान, २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने पर्यटकांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, त्यात भारतीय नागरिकांसोबतच नेपाळचे नागरिकही समाविष्ट आहेत. हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर निर्बंध लादले आहेत. india vs pakistan पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा समितीची बैठक होऊन पाकिस्तानी नागरिकांना माघारी पाठवण्याचा निर्णय घेतला गेला.भारताने २४ एप्रिल रोजी पाकिस्तान नागरिकांसाठी व्हिसा संबंधित नियम कडक केले असून, १ मेपूर्वी भारतात परत येण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर, १९१ पाकिस्तानी नागरिक भारतातून पाकिस्तानात परतले आहेत, तर २८७ भारतीय नागरिक पाकिस्तानातून भारतात परतले आहेत.