भारतीय संस्कृतीत 'तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याची परंपरा'

भांड्यातील पाण्याचे फायदे आणि योग्य वापर

    दिनांक :28-Apr-2025
Total Views |
Copper pot भारतीय संस्कृतीमध्ये तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याची एक खूप जुनी परंपरा आहे. ही परंपरा केवळ धार्मिक दृष्टीकोनातून नाही, तर आरोग्याच्या दृष्टीकोनातून देखील महत्त्वाची मानली जाते. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये तांब्याच्या भांड्याचा उपयोग आरोग्यवर्धक ठरतो, असे सांगितले आहे.तांब्याचे भांडे वापरल्याने पाण्याच्या शुद्धतेत सुधारणा होऊन त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म येतात. तांब्याच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात आणि पचनक्रिया सुधारते. तसेच, तांब्याच्या पाण्याचा नियमितपणे वापर केल्याने हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, रक्तदाब कमी होतो, आणि रक्तवाढीची प्रक्रिया सुधरते.
 
 
 

Copper pot  
विशेषत: Copper pot समर सीझनमध्ये तांब्याच्या पाण्याचा वापर अधिक फायदेशीर ठरतो. पाणी थोडं उबदार ठेवून तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास त्याचे पोषणमूल्य आणखी वाढते. तांब्याचे पाणी पिण्याची परंपरा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा भाग आहे, जो आरोग्याच्या दृष्टीने अनमोल ठरतो.तांब्याच्या भांड्याचा वापर फक्त आरोग्यासाठीच नाही, तर भारतीय जीवनशैलीचा एक अनिवार्य घटक मानला जातो.
 
 
तांब्याच्या पाण्याचे फायदे:
 
 
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्यामुळे शरीर रोगांशी लढण्यास सक्षम होते.
पचन सुधारते आणि पोट स्वच्छ ठेवण्यास मदत होते. त्यामुळे पोटदुखी, गॅस व अपचन यांसारख्या समस्या दूर होऊ शकतात.
अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते, शरीरातील मुक्त रॅडिकल्स काढून टाकते व जळजळ कमी करते.
हृदयाचे आरोग्य सुधारते आणि मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ करते.
वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, कारण चयापचय प्रक्रिया गतिमान होते.
लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत करते, ज्यामुळे रक्ताची गुणवत्ता सुधारते.
तांब्याच्या पाण्याचा योग्य वापर का महत्त्वाचा आहे?
न्यूट्रिशनिस्ट ल्यूक कौटिन्हो यांच्या मते:
तांबे शक्तिशाली आहे, त्यामुळे त्याचा योग्य प्रमाणातच वापर करणे आवश्यक आहे.
जास्त प्रमाणात तांब्याचा वापर केल्यास शरीरात विषारी प्रभाव होऊ शकतो.
छातीत जळजळ, मळमळ, पोटदुखी यांसारख्या त्रासांचा सामना करावा लागू शकतो.
शरीरातील झिंकच्या संतुलनावरही परिणाम होऊ शकतो, जो रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वाचा आहे.
 
तांब्याचे पाणी पिताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी:
 
फक्त एक ते दोन कप तांब्याचे पाणी रोज खोलीच्या तापमानाला प्या.
दिवसभरात तांब्याचे पाणी गरम करणे किंवा लिंबू घालणे टाळा.
अधिक प्रमाणात सेवन करू नका, योग्य मर्यादेतच वापर करा.