तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Kidney transplant यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील डाॅ. राजीव राठाेड यांनी नांदेड येथील स्टार किडनी हाॅस्पिटलमध्ये 50 च्यावर मूत्रपिंड (किडनी) प्रत्याराेपण केले आहे. नुकतीच त्यांनी एक अत्यंत जटिल किडनी प्रत्याराेपण शस्त्रक्रिया केली आहे.
मूत्रपिंडविषयक अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचे यशस्वी शस्त्रक्रियात्मक निराकरण करणारे प्रशंसित युराेलाॅजिस्ट डाॅ. राजीव राठाेड यांच्या नेतृत्वात नुकतेच नांदेडमधील स्टार किडनी हाॅस्पिटलमध्ये एक अत्यंत जटिल किडनी प्रत्याराेपण शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला नवजीवन लाभले.त्याचा निराधार ठरलेला रुग्ण आता पुनः हसत-खेळत आयुष्य जगत आहे. नम्रता आणि कुशलतेने पार पाडलेल्या या किडनी प्रत्याराेपणामुळे रुग्णास ‘नवी आयुष्याची भेट’ मिळाली.
डाॅ. राजीव राठाेड Kidney transplant यांचे शिक्षण पुसद येथे झाले असून, त्यांनी एमबीबीएस, एमएस (शस्त्रक्रिया) आणि डीएनबी (युराेलाॅजी) या उच्च शैक्षणिक पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांनी रक्तगट न जुळणाèया प्रकरणांमध्येही त्यांनी यशस्वी प्रत्याराेपण केले आहे.किडनी रुग्णसेवेतील त्यांच्या कामगिरीला अनेकदा स्थानिक स्तरावर काैतुकाने गाैरवण्यात आले आहे. त्यांच्यासाेबत डाॅ. विजय मैदपवाडसुद्धा किडनी रुग्णसेवेत आहेत.
कुटुंबियांचेही भविष्य उजळून टाकणारा उपक्रम
मूत्रपिंडाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी किडनी प्रत्याराेपण हा उपचारांचा सर्वाेत्तम पर्याय मानला जाताे. या प्रगत शस्त्रक्रियेमुळे दीर्घकाळ हाॅस्पिटलवर अवलंबून असणारे रुग्ण पुन्हा सामान्य आयुष्य जगू शकतात. ही शस्त्रक्रिया \क्त एका रुग्णाचेच नव्हे तर त्याच्या कुटुंबियांचेही भविष्य उजळून टाकणारी ठरते.
डाॅ. राजीव राठाेड