दिग्रसला भगवान परशुराम भार्गव दर्शनयात्रेचे स्वागत

29 Apr 2025 21:56:37
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
Parshuram Jayanti : ब्राह्मण समाजाचे आराध्य भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सव निमित्त अहिल्यानगर ते जानापाव भार्गव दर्शन यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा दिग्रसमध्ये आल्यानंतर येथील ब्राह्मण समुदायाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. सकल ब्राह्मण समाजसेवा संस्थान अहिल्यानगर आणि श्री परशुराम प्रतिष्ठान अहिल्यानगरच्या माध्यमाने मागील दहा वर्षांपासून भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भार्गव यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.
 
 
parshuram
 
ही यात्रा दिग्रस मार्गाने जात असतान येथील ब्राह्मण समुदायाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या यात्रेसोबत आयोजक राजाभाऊ पोतदार, सिद्धेश्वर शास्त्री, निसळ गुरुजी, अरुण आवटी, शिरीष देशपांडे, प्रभा भोंग, विजय देशपांडे, अतुल शुक्ल, सार्थक भोंग आणि इतर मान्यवर मार्गस्थ आहेत.
 
 
ही यात्रा 21 जिल्हे दोन राज्यांतून 1800 किमीचा प्रवास करणार आहे. ब्राह्मण समुदायाच्या वतीने या यात्रेसाठी अरविंद मिश्रा, छोटूकाका जोशी, मनोज राठोड, रमेश राजपुरोहित, सुरेंद्र मिश्रा, राहुल देशपांडे, सतीश महाजन, महेश महाजन, रोहिणी दाभाडकर, कविता हरसुलकर, स्वाती देशपांडे, माधुरी गंगथडे, रूपाली देशपांडे आणि ब्राह्मण समुदायाच्या प्रतिनिधींनी विशेष प्रयत्न केले.
 
 
याप्रसंगी खासदार संजय देशमुख यांना भगवान परशुरामाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तर भाजपा नवनियुक्त शहराध्यक्ष अभय इंगळे यांचा देखील परशुरामाची प्रतिमा देऊन सत्कार आयोजकाच्या वतीने करण्यात आला.
 
हिंदू संस्कृती संवर्धन हा उद्देश
 
 
यात्रेच्या माध्यमातून ठिकठिकाणच्या सर्वशाखीय ब्राह्मण समुदायाशी संवाद साधणे, संपूर्ण ब्राह्मण समुदायाला एक सूत्रात संघटित करणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे आणि हिंदू संस्कृती संवर्धन आणि प्रचार प्रसार करणे, हा हेतू या यात्रेमागे आहे.
प्रभा भोंग
यात्रा आयोजक, अहिल्यानगर
Powered By Sangraha 9.0