माळपठारावरील शेत जमिनीच्या सिंचनासाठी पाणी कुठून आणणार..?

    दिनांक :29-Apr-2025
Total Views |
रवी देशपांडे,
तभा वृत्तसेवा
पुसद, 
irrigation of agricultural lands : माळपठारावरील चाळीस गावांचा प्रश्न आता चर्चेला आलेला आहे. माळपठारावरील चाळीस गावांतील जनतेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. माळपठार हे समुद्रसपाटीपासून खूप उंच असल्याने पाण्याची पातळी खूपच खोल आहे. म्हणून येथील विहिरींना ओलितासाठी पाणी लागत नाही.
 
 
 
y24Apr-Malpathar
 
 
 
पैनगंगा प्रकल्पाचे पाणी मराठवाड्याने पळविले आणि येथील सत्ताधारी काहीही करू शकले नाहीत. दोन दशकांपूर्वी या भागातील गावांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सुधाकर नाईकांनी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना माळपठार पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून घेतली. ही पिण्याच्या पाण्याची योजनासुद्धा फारशी यशस्वी झाली नाही. तेव्हा सिंचनासाठी पाणी येईल कुठून, हा प्रश्न स्वाभाविकच आहे.
 
 
 
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघातून संजय देशमुख निवडून आले. प्रचारादरम्यान त्यांनी माळपठारावरील शेतजमिनीसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी लोकसभेत हा प्रश्न मांडला आणि प्रथमच पुसद तालुक्यातील जिव्हाळ्याच्या प्रश्नाला वाचा फोडली. राज्याला दोन मुख्यमंत्री आणि सातत्याने मंत्रीपद दिलेल्या पुसद तालुक्यातील 40 गावे स्वातंत्र्यानंतरही कोरडीच आहेत.
 
 
सत्ताधाèयांच्या निष्क्रियतेचा प्रश्न देश पातळीवर मांडण्यात आला. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून माळपठारावरील जनतेच्या वतीने नुकताच खा. संजय देशमुख यांचा सत्कारही करण्यात आला. आता प्रश्न उपस्थित होतो की, सिंचनासाठी पाणी कुठून आणणार ?
इसापूर धरणाचे पाणी मराठवाड्याने पळविले. माळ पठारावरील भागात पाण्याची पातळी खूपच खोल आहे. मग सिंचनासाठी पाणी कुठून येणार ? सिंचन तलाव, पाझर तलाव, बंधारे असे काही पर्याय समोर आहेत का, नुसता हवेत गोळीबार करण्यात काहीही अर्थ नाही आहे.
 
 
पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात सिंचनासाठी दूरवरून पाणी नेऊन व्यवस्था केलेली आहे. माळपठाराच्या एका बाजूला पैनगंगा धरण आहे आणि दुसèया बाजूला पुस धरण आहे. परंतु ही 40 गावे मात्र अद्यापही तहानलेली आहेत. नाईकांनी या भागातील शेतजमिनीच्या सिंचनासाठी काहीही केले नाही. खासदार संजय देशमुख यांनी मात्र या प्रश्नाला वाचा फोडली आणि जनतेच्या आशाआकांक्षा पल्लवीत झाल्या. पण ठोस उपाययोजना कोण आणि कशी करणार, हा मोठा प्रश्न आहे.