तभा वृत्तसेवा
राळेगाव,
Pahalgam terrorist attack : मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याचा राळेगाव शहरात हिंदू संघटनेने क्रांती चौक येथे हातात पोस्टर घेऊन तीव्र निषेध नोंदवला.
काही पर्यटक काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले असता, तेथे अतिरेक्यांनी त्यांचा धर्म विचारून ते हिंदू असल्याचे समजल्यावर त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात काही निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, राळेगाव शहरात हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत अतिरेक्यांच्या या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. संघटनेच्या पदाधिकाèयांनी ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी व अमानवी असल्याचे सांगून, केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी केली.