हडस हायस्कूल येथे जागतिक पाणी दिवस

    दिनांक :03-Apr-2025
Total Views |
नागपूर,
Hadas Primary and High School हडस प्रायमरी व हायस्कूल येथे जागतिक पाणी दिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.पाण्याचे महत्त्व सांगणारी भित्तीपत्रके, पाण्याच्या योग्य वापराविषयी जागरूकता निर्माण करणारी घोषवाक्ये, निबंध स्पर्धा इत्यादि उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
 
 
 
pani
 
 
 
शाळेच्या शिक्षिका जयश्री बपोरीक यांनी पाण्याचे दैनंदिन जीवनात महत्त्व व पाण्याचे योग्य नियोजन व संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. Hadas Primary and High School वर्ग  ८ च्या विद्यार्थिनींनी जल संवर्धन विषयावर घोषवाक्ये सादर केली,  वैदेही अराणके यांनी जल संवर्धन प्रतिज्ञेचे वाचन केले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन करण्यासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिज्ञा घेतली.कार्यक्रमाला मुख्याध्यापिका मृणाल  कासखेडीकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सौजन्य: गजानन रानडे,संपर्क मित्र