बालवयात संस्कार केल्यास रामप्रमाणेच प्रशासक तयार होतील

डॉ. शरद निंबाळकर यांचे प्रतिपादन रामस्मरण व्याख्यानमालेचा दुसरा दिवस

    दिनांक :03-Apr-2025
Total Views |
नागपूर,
Ramsmaran vyakhayanmala राम नामाचा जप केल्याने जीवनाचे कल्याण होते, असे म्हटल्या जाते. तसेच आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी रामायणातील प्रेरित करणारी आहे. श्रीरामाने बालवयातच प्रशासकीय कौशल्ये आत्मसात केली होती. रामायणात रामाचे उत्कृष्ट चरित्र वर्णन केले आहे. प्रभू रामाच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांवर बालवयात चांगले संस्कार केल्यास रामप्रमाणेच उत्कृष्ट प्रशासक तयार होतील, असा विश्वास पं.दे.कृ. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी व्यक्त केला.

dr.nimbalkar 
 
 
डॉ. हेडगेवार समितीतर्फे कलासंगम व सांस्कृतिक मंडळ आणि केशवनगर सांस्कृतिक सभा यांच्या सहकार्याने स्व. सुनील देवउपाध्ये यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रेशिमबागेतील महर्षी व्यास सभागृहात सुरू असलेल्या रामस्मरण व्याख्यानमालेच्या दुसर्‍या दिवशी ‘प्रशासक राम’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध व्यावसायिक बी.सी भरतीया, केशवनगर सांस्कृतिक सभेेचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर, कलासंगमचे उपाध्यक्ष प्रकाश कार्यकारिणी सदस्य डॉ. अविनाश वासे उपस्थित होते.

जीवन जगण्याचे काव्य रामायणात
डॉ. शरद निंबाळकर पुढे म्हणाले, जीवन जगण्याचे काव्य रामायणात असून हे काव्य अनंत काळापर्यंत कायम राहणार आहे. रामाने प्रशासनाची सुरुवात त्यांचे गुरू वशिष्ठ, विश्वामित्र यांच्याकडे केली. आपल्या शक्तीचा उपयोग सत्कर्माकरिता करायला हवा, दुर्जनांचा नाश करण्याकरिता शस्त्राचा वापर व्हायला याचे बीज लहानपणीच रामाच्या मनात रोवले गेले होते. बालवयातील रामावर झालेले संस्कार, मूल्य आजच्या काळात आपण आपल्या मुलांना सांगतो का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आईवडिलांनी आपल्या मुलांचे गुण ओळखून त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन करण्याची नितांत गरज आहे.
जिथे कौशल्य आहे तिथे राम
प्रभू रामचंद्रांच्या काळातील प्रशासन हे अधर्माशी अनीतीशी युद्ध असे होते तर आजचे प्रशासन साहेबांप्रमाणे झाले आहे. हजारो वर्षांचा कालावधी लोटून गेला मात्र आपण आज रामाला विसरलो नाही? पहिला दशरथचा मुलगा म्हणजे राम होय. तर दुसरा राम घटघट में बैठा, तिया राम जगत पसारा और चौथा राम सबसे न्यारा सबसे न्यारा. जिथे कौशल्य आहे तिथे राम अहंकार गेला तर मी देखील राम होऊ शकतो.Ramsmaran vyakhayanmala रामायण अनेक भाषांमध्ये असल्याने देशविदेशात रामायण वाचल्या जाते.
 
जीवनाचा कानमंत्र रामाने दिला
अध्यक्षीय भाषणात बी. सी. भरतीया यांनी, रामाचे स्मरण करण्याची काय आवश्यकता आहे ते तर मनामनात आहेत. परंतु रामचरित्रात जीवनाचे वेगवेगळे पैलू दिसतात. आज कुटुंबव्यवस्था नष्ट होत चालली आहे. जीवनात सांभाळणे आवश्यक आहे. रामचरित्रातून जीवनाचे मूल्य कळतात. सत्कृत्य, सत्चरित्र घडविण्याकरिता युवकांना रामचरित्र मार्गदर्शक ठरेल. समाज संस्कारित व्हावे यासाठी रामाने आपणास शिकवण दिली आहे. एकंदरीत जीवनाचा कानमंत्र रामाने दिला आहे. यावेळी सरस्वती शिशुमंदिरच्या विद्यार्थ्यांनी ‘मुखी वदावे गावे तुम्ही राम राम राम’ हे गीत सादर केले. ‘रामस्मरण’ व्याख्यानमालेचे समारोपीय पुष्प उद्या एप्रिल रोजी यवतमाळ येथील संस्कार भारती विदर्भ प्रांत महामंत्री प्रा. विवेक कवठेकर गुंफणार आहेत.