"स्वर्गीय आनंदाची अनुभूती" गीत रामायण

    दिनांक :03-Apr-2025
Total Views |
नागपूर,
Senior National Corporation Vidarbha ज्येष्ठ ना.महामंडळ विदर्भ,लोकतंत्र सेनानी संघ आणि स्वरसाधना यांच्या संयुक्त विद्यमाने नृत्याविष्कारासह गीतरामायण सादरकरण्यात आला होता . यावेळी मंचावर प्रा. प्रभुजी देशपांडे, एड अविनाश तेलंग, बिंदूमाधव देव, जयंत पुराणिक, प्रा पद्मजा सिन्हा,शामजी देशपांडे आणि प्रमुख अतिथी रवीजी कासखेडीकर होते.निवडक १८ गाणी सुरेल आवाज, मधुर संगीत,अर्थवाही शब्द आणि भालेराव यांच्या नृत्यनिर्देशनात भावपूर्ण नृत्यविष्कार असा दुर्मिळ कार्यक्रम प्रेक्षकांनी अनुभवला.मिळाले.
  

anadi  
 
 या कार्यक्रमास उज्वला अंधारे आणि प्रा. विवेक अलोणी यांच्या प्रसंगोचित निवेदनाने रंगत वाढविली. शाम देशपांडे यांचे "पराधीन आहे.Senior National Corporation Vidarbha जागती पुत्र मानवचा"या गीताने श्रोते अंतर्मुख झाले होते . विनोद वखरे,गुणवंत घटवाई,अशोक गोकर्ण, शशांक दंडे आणि अनेक कलावंतांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.डॉ अरविंद शेंडे यांनी आभार मानले. छाया वानखेडे यांच्या पसायदानाने   कार्यक्रमाची सांगता केली.
 
सौजन्य:अविनाश तेलंग,संपर्क मित्र