नागपूर,
Stop the cementation शहरात सर्वत्र सिमेंट व काँक्रिट रस्त्याचे जाळे निर्माण हाेत आहे. हे सिमेेंट रस्ते तयार करताना हाेणाèया फफ्लाय अॅशच्या उपयाेगाने माेठ्या प्रमाणात धूळ निर्माण हाेते. यातून श्वसनाचे आजार बळावत आहे. तसेच रस्ते उंच व नागरिकांची घरे आता ठेंगणी हाेत चालल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. त्यामुळे या सिमेंट रस्त्यांच्या निर्मितीला ‘जनमंच’ या सामाजिक संस्थेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
सिमेंट रस्त्यांच्या बांधकामातील तांत्रिक त्रुटी आणि पर्यावरणीय परिणाम तपासण्यासाठी थर्ड-पार्टी ऑडिट करण्याची आणि शहरातील रस्त्यांची गुणवत्ता आणि सर्वसामान्यांच्या आराेग्यावर हाेणारे परिणाम तपासण्यासाठी वैद्यकीय संस्थांकडून अहवाल मागविण्याची विनंती जनहित सुनावणीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृषाली जाेशी यांच्यासमक्ष झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने रस्तेनिर्मितीत सहभागी असलेल्या महापालिकेसह सर्व प्रशासकीय संस्थांना तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
सिमेंट-काँक्रीट रस्त्यांमुळे शहराची उष्णता वाढली आहे. यामुळे पावसाचे पाणी जमिनी न मुरता ते वाट मिळेल तिकडे वाहून जाते. तसेच कार्बन उत्सर्जनातही यामुळे माेठी वाढ झाली असून त्याचा आराेग्यावरही विपरित परिणाम हाेत असल्याचे अनेक संशाेधनातून निदर्शनास आले आहे. रस्ते बांधकामात स्टाॅर्म वाॅटर ड्रेन, सीवेज लाईन, वीजपुरवठ्याचे वायर्स आणि वाॅटर सप्लाय ग्रिड्स यांच्या रचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सिमेंट-काँक्रिटच्या मिश्रणात फफ्लाय-अॅशचा अधिक वापर हाेत असल्याने रस्त्यांची गुणवत्ता घसरली आहे. तसेच यातून उडणाèया धुलीकणांमुळे श्वसनाचे आजार बळावल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे थर्ड पार्टी ऑडिटसाठी सेंटर ाॅर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट आणि अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे या संस्थेचे नाव याचिकेच्या माध्यमातून सुचविण्यात आले आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड परवेज मिर्झा यांनी बाजून मांडली.
धुळीमुळे श्वसनाचे आजार बळावले
सिमेंट्र-काँक्रिटच्या रस्त्यांमध्ये फफ्लाय-अॅशचा अधिक वापर हाेत असल्याने शहरात धुळीचे प्रमाण वाढले. परिणामी सर्वसामान्यांना श्वसन, त्वचा, डाेळे, मज्जासंस्था आणि ुफफ्ुसाचे आजार बळावले आहेत. या दाव्याची चाैकशी करण्यासाठी नागपूर वैद्यकीय महाविद्यालयांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्याची विनंतीही याचिकेतून करण्यात आली आहे. तसेच रस्त्यांची उंची, जलनिःसारण आणि डक्टिंचाचा विचार न करता रस्ते बांधले गेले. परिणामी पावसाचे पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. साेबतच निकृष्ट दर्जाचे मॅनहाेल कव्हर्स आणि पेव्हर ब्लाॅक्स वापरण्यात आल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याचे याचिकेत नमूद आहे.