अवकाळी पावसाचा फटका

03 Apr 2025 14:43:04
नागपूर,
Unseasonal rains hit हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिल्यानंतर मंगळवारच्या मध्यरात्री वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटून विद्युत खांब व तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. तसेच बुधवारी दुपारी ४ वाजता पुन्हा वादळी वार्‍यासह आलेल्या पावसामुळे वीज व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. शहरातील अनेक मार्गावर झाडे पडल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. मध्यरात्री वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावल्याने वीजपुरवठा बंद झाला होता. बेसा मार्गावरील रामटेके नगर, म्हाळगी नगर येथील अनेक भागात बुधवारी सकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. दरम्यान, महावितरणकडून दिवसभर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. असलेल्या वस्तींचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी परिश्रम घेत होते. अवकाळी पावसाने झोडपल्याने वीज वितरण व्यवस्थेवर परिणाम झाला. तर काही ट्रान्सफॉर्मर बंद झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मोठया झाडांच्या फांद्या तुटून विद्युत तारांवर पडल्याने नुकसान झाले.
 

dfgdg

मेडिकल परिसरातील केबलमध्ये आग
महावितरणच्या महाल विभागाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. तसेच नगर, रामेश्वरी, अभय नगर, बेसा, मानेवाडा, रामबाग, महाल, सक्करदरा, नवीन सुभेदार, जानकी नगर, भगवान नगर, उमरेड रोड, सूतगिरणी. वाठोडा, बगडगंज, श्रीकृष्ण नगर, वाडी, त्रिमूर्ती नगर, छत्रपती नगर, सोमलवाडा, मनीष या भागातील वीज पुरवठा अनेक तास ठप्प होता.Unseasonal rains hit मेडिकल कॉलेजच्या भिंतीजवळ येणार्‍या केबलला जास्त भार आल्याने आग लागली. त्यामुळे वंजारी व मेडिकलच्या आसपासच्या इतर भागात बुधवारी दुपारी अनेक तास वीज नव्हती. .
Powered By Sangraha 9.0