हाेर्डिंग्जची कंत्राट प्रक्रिया रद्द करा

महापालिकेला उच्च न्यायालयाच आदेश : फुटपाथवरील होर्डिंग्ज ठरविले अवैध

    दिनांक :03-Apr-2025
Total Views |
नागपूर, 
hoardings शहरातील बहुतेक रस्त्यांवरील फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने पादचाèयांसाठी जागाच उरलेली नाही. याबाबत सिटीझन फोरम फॉर इक्वॅलिटीचे अध्यक्ष मधुकर कुकडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान अ‍ॅड. तुषार मंडलेकर यांनी फुटपाथवरील हाेर्डिंग्जबाबत मुद्दा उपस्थित केला. यासंदर्भात दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाने फुटपाथवरील होर्डिंग्ज कायद्याला धरून नसल्याचे निरीक्षण नाेंदवत, ‘कंत्राट तुम्ही रद्द करता की, उच्च न्यायालयाने तसे आदेश द्यावेत’, अशी विचारणा महापालिकेला केली आणि संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले.
 
 
hicourt
 
उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान अ‍ॅड. मंडलेकर यांनी फुटपाथवरील हाेर्डिंग्जचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर उच्च न्यायालयाने ‘परिस्थिती जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले हाेते. या संदर्भात महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चारठाणकर यांनी प्रतिज्ञापत्र सादर करत 2001 च्या धाेरणानुसार, ुटपाथवर हाेर्डिंग्ज उभारण्याचा अधिकार महापालिकेला असल्याचा दावाही केला हाेता. इतकेच नव्हे तर या धोरणाला उच्च न्यायालयाची अनुमती असल्याची माहितीही दिली होती. मात्र त्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वतीने 2022 साली अमलात आलेले राज्याचे जाहिरात धाेरण सादर करण्यात आले ज्यात फुटपाथवरील हाेर्डिंग्सला विराेध दर्शविण्यात आला हाेता.hoardings अखेर दाेन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने वरील आदेश दिले.

मनपा म्हणते फुटपाथवर चालण्यास अडथळा नाहीमहापालिकेने 3 डिसेंबर 2024 राेजीच्या निविदेत जाहिरात हक्क देण्यासाठी काही ठिकाणे चिन्हांकित केली हाेती. त्यानुसार, ूटपाथच्या एका बाजूला जमिनीपासून 15 फुट उंच हाेर्डिंग्ज उभारण्याबाबत प्रक्रिया राबविण्यात आली. यामुळे फुटपाथवरून चालणाèया लाेकांना काेणताही अडथळा येणार नाही असे देखील महापालिकेने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले हाेते. निविदा जारी करण्यापूर्वी महानगरपालिकेने 4 मार्च 2024 राेजी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. ज्या समितीने हाेर्डिंग्जमुळे फुटपाथवरून चालताना काही गैरसाेय हाेते का, याची माहिती शोधण्याचे काम केले. समितीने हा अहवाल प्रशासकाला सादर केला. त्यानुसार 78 ठिकाणी फुटपाथच्या एका बाजूला जाहिरात हक्क देण्यासाठी निविदा काढण्यात आली. 15 मार्च 2024 राेजी प्रशासकाने निविदेला हिरवा कंदील दिला.