पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन मौनात

30 Apr 2025 12:43:58
मुंबई,
Amitabh Bachchan २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर मौन बाळगले आहे. गेल्या ९ दिवसांपासून ते त्यांच्या फेसबुक आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर पोस्ट तर करत आहेत, मात्र त्या पोस्टमध्ये एकही शब्द नसतो. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी चर्चा आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
 
 
 
Amitabh Bachchan
 
 
या दहशतवादी Amitabh Bachchan  हल्ल्यात बैसरण खोऱ्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये बहुसंख्य हिंदू पर्यटक होते. या घटनेनंतर अमिताभ बच्चन यांचा हा अचानक आलेला मौन अनेकांच्या लक्षात आला. काही युजर्सनी म्हटले की, बच्चनसाहेब पाकिस्तानवर प्रतिघात झाल्याशिवाय काही बोलणार नाहीत. काहींनी त्यांच्या मौनाचा संबंध रेखा किंवा जया बच्चन यांच्याशी जोडला.
 
 
सोशल मीडियावर मोठं चर्चेचा विषय
 
 
अमिताभ Amitabh Bachchan यांचं हे मौन सोशल मीडियावर मोठं चर्चेचा विषय ठरत असून, लोक त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींनी एलोन मस्कच्या xAI कंपनीच्या ग्रोक या AI चॅटबॉटकडे मदत मागितली. एका युजरने लिहिलं – "नमस्कार @grok, कृपया समजावून सांगा की बच्चनजी असं का करत आहेत?"चाहत्यांनी त्यांच्या मौनावर चिंता व्यक्त करत लिहिलं – "शब्द नाहीत पण खूप भावना आहेत सर..." तर काहींनी विनोदाच्या सुरात म्हटलं – "जयाजी लिहू देत नाहीयेत का?"अमिताभ बच्चन यांचे वय ८२ वर्षे असून, आजही ते सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असतात. मात्र, अशा प्रकारे सलग नऊ दिवस मौन बाळगणं हे त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच धक्कादायक आहे.
Powered By Sangraha 9.0