‘खवय्या’ ऋषीजींची हॉस्पिटलमधील एक रागीट आठवण

ऋषी कपूर यांच्या निधनाला पाच वर्षे

    दिनांक :30-Apr-2025
Total Views |
मुंबई,
Rishi Kapoor आज अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनाला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. अभिनयातील त्यांची कारकीर्द जितकी तेजस्वी होती, तितकीच त्यांची खवय्येगिरीची ओळखही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होती. चित्रपटांमधील त्यांचे विविध रूप असो वा त्यांच्या खऱ्या आयुष्यातील स्पष्टवक्तेपणा, ऋषी कपूर हे नेहमीच चर्चेत राहिले. सोशल मीडियावरही ते बेधडक मते मांडत असत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक किस्सा आज पुन्हा आठवला जातो, तो म्हणजे हॉस्पिटलमधील त्यांच्या अन्नाबाबतचा राग.
 
 

Rishi Kapoor
लीलावती रुग्णालयात Rishi Kapoor उपचार सुरू असताना पोषणतज्ञ ख्याती रुपाणी यांनी त्यांच्या आहाराची जबाबदारी घेतली होती. एका मुलाखतीत बोलताना ख्याती यांनी उघड केले की, ऋषी कपूर हे त्यांचे असे क्लायंट होते जे त्यांच्या जेवणाविषयी फारच आग्रही आणि कधीकधी असभ्यही असायचे. लीलावती रुग्णालय हे शाकाहारी असल्यामुळे तिथे मांसाहारी जेवण देण्याची परवानगी नव्हती. पण ऋषी कपूर यांना मांसाहारी पदार्थांची खूप आवड असल्यामुळे त्यांना रुग्णालयातील जेवण खूप कंटाळवाणे वाटायचे.
 
 
खवय्या व्यक्ती
 
 
ख्याती म्हणाल्या, “ऋषीजी एक खवय्या व्यक्ती होते. ते त्यांच्या जेवणात कोणतीही तडजोड सहन करत नसत. नीतू कपूर नेहमी म्हणायच्या – ‘तू त्याला गुलाबजाम का दिलास?’ आणि मला वाटायचं की ते फक्त मजा करत आहेत, पण खरेच ते त्यांच्या जेवणाबद्दल खूप संवेदनशील होते.”
ख्याती पुढे सांगतात, “लीलावती रुग्णालय हे पूर्णतः शुद्ध शाकाहारी आहे. तिथे अंडीही वापरली जात नाहीत. त्यामुळे तिथे येणाऱ्या अनेक रुग्णांसाठी अन्नाची ही मर्यादा एक मोठं बंधन असतं. ऋषीजी हे त्या रुग्णांपैकी एक होते, ज्यांना ही गोष्ट खूप खटकायची.”आज ऋषी कपूर आपल्यात नसले तरी त्यांच्या खवय्या स्वभावाच्या आणि स्पष्टवक्तेपणाच्या अशा अनेक आठवणी त्यांच्या चाहत्यांच्या मनात कायम राहतील.