Saffron-cardamom tea रात्रीच्या वेळेस शरीराला विश्रांती आणि शांत झोपेची आवश्यकता असते. अशा वेळी झोपण्यापूर्वी काही आरोग्यदायी आणि चविष्ट प्यायचं असेल, तर केशर-वेलची चहा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, या चहामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म अनेक शारीरिक व मानसिक समस्यांवर प्रभावी ठरतात.
संशोधनानुसार,Saffron-cardamom tea काश्मिरी केशर हे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते आणि स्मरणशक्ती वाढवते. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकतात, त्वचा उजळवतात आणि झोपेची गुणवत्ता वाढवतात. दुसरीकडे, वेलची पचनक्रिया सुधारते, गॅस व आम्लता कमी करते आणि मन शांत ठेवते.या दोघांच्या मिश्रणामुळे तयार होणारा चहा केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. दररोज रात्री याचे सेवन केल्याने तणाव कमी होतो, त्वचेचा नूर वाढतो, चयापचय क्रिया गतिमान होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. यामुळे संपूर्ण दिवसाचा थकवा दूर होतो आणि शरीराला नवचैतन्य मिळते.
नियमित केशर-वेलची चहा प्यायल्याने निद्रानाशासारख्या समस्यांवरही उपाय होतो. वेलचीमधील नैसर्गिक तेले आणि केशरमधील सेरोटोनिन वाढवणारे घटक मन शांत ठेवतात आणि झोपेची गहिराई वाढवतात. त्यामुळे झोप न लागण्याची समस्या दूर होते आणि झोप अधिक आरामदायी होते.या चहामुळे त्वचेलाही अनेक फायदे होतात. केशरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील मुक्त रॅडिकल्स काढून टाकतात, तर वेलची त्वचा स्वच्छ करते आणि मुरुमांपासून मुक्ती देते. त्यामुळे रात्री याचे सेवन त्वचा दुरुस्त होण्यास मदत करते.
अपचन, पोट फुगणे
रात्री जड अन्न Saffron-cardamom tea घेतल्यानंतर अपचन, पोट फुगणे किंवा जळजळ होणे अशा समस्या होत असल्यास हा चहा अत्यंत उपयुक्त ठरतो. वेलचीतील एंजाइम्स आणि केशरचा सौम्य गुणधर्म पचनक्रिया सुलभ करतो.दिवसभराच्या धकाधकीनंतर मनाला शांत ठेवण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी केशर-वेलची चहा हा नैसर्गिक उपाय ठरतो. केशर मूड स्थिर ठेवणाऱ्या हार्मोन्सचे प्रमाण वाढवते, तर वेलची मानसिक थकवा दूर करते.दररोज रात्री झोपण्यापूर्वी केशर-वेलची चहा घेतल्यास शरीर नैसर्गिकरीत्या डिटॉक्स होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बदलत्या हवामानातील सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासूनही संरक्षण मिळते.