भारतीय क्रिकेटचे भविष्यातील ‘वैभव’

    दिनांक :30-Apr-2025
Total Views |
वेध...
 
आमच्याकडे प्रतिभावानांची वानवा नाही. क्षेत्र कुठलेही असाे, कुठे ना कुठे या प्रतिभेची चुणूक जाणवते आणि भारताच्या प्रत्येक क्षेत्रात भविष्य हे उज्ज्वलच आहे, याची खात्री देऊन जाते. आमचे क्रीडा क्षेत्र समृद्ध आहे. ते अधिक समृद्ध व्हावे म्हणून हाेणारे प्रयत्न सर्वश्रुत आहेत. अशावेळी एखादा ‘सूर्यवंशी’ पुढे येत मी भारतीय खेळाचे भविष्य म्हणून ‘छातीठाेक’पणे सांगून सर्वांना भुरळ घालून जात असेल तर हे भारतीय क्रिकेटचे ‘वैभव’च म्हणावे लागेल. 
आज क्रिकेटचे वेड शब्दात वर्णन करण्यापलीकडे आहे. म्हणून तर क्रिकेटवेडी तरुणाई आपल्या क्रिकेटच्या नायकाची एक झलक पाहण्यासाठी जीवाचे रान करते. भारतीय खेळ अनेक आहेत. परंतु त्या क्रिकेटची नशा भल्याभल्यांना वेड लावून जाणारी आहे. भारतीय क्रिकेटचा इतिहास फार जुना आहे. Young India Vedha 1928 मध्ये बीसीसीआयची स्थापना झाली. भारताने पहिला कसाेटी सामना 25 जून 1932 साली खेळला. तेव्हापासून भारतीय क्रिकेटचा आलेख ऊर्ध्व असाच आहे. आज या शृंखलेत अनेक नावाजलेले माेती जाेडले जात आहेत. रणजितसिंह भिवाजी जडेजा यांना भारतीय क्रिकेटचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यानंतर आज अनेक दिग्गज भारतीय क्रिकेटला समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी झटले.
  

Young India Vedha 
 
लढा अमरसिंग, लाला अमरनाथपासून सुनील गावस्कर, रवी शास्त्री, कपिल देव, चेतन शर्मा, अनिल कुंबळे असाे की जवागल श्रीनाथ! अगदी अलिकडच्या काळात क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकरने आपली ओळख निर्माण केली आणि अजूनही या समृद्ध परंपरेचा भाग हाेण्यासाठी अनेक खेळाडू रांगेत आहेत. खेळासाठी पाेषक आणि सकारात्मक असलेल्या भूमीत आज प्रतिभेची कमी नाही. केवळ अशांना याेग्य व्यासपीठ आणि दिशा मिळण्याची गरज आहे. असाच एक प्रतिभावंत सध्या सर्वांच्या मनात घर करून बसला आहे आणि ताे म्हणजे वैभव सूर्यवंशी! बिहार राज्यातील ताजपूर येथे 24 मार्च 2011 राेजी जन्मलेला वैभव अवघ्या 14 वर्षे आणि 32 दिवसांच्या वयातच असंख्य भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. सुरू असलेल्या आयपीएलच्या निमित्ताने त्याने स्वतःला सिद्ध केले आणि जागतिक स्तरावरील विक्रमही स्थापन केले. आयपीएलचा अवघा तिसरा सामना खेळताना गुजरात विरुद्ध 35 चेंडूत 101 धावांची ऐतिहासिक खेळी करणा-या वैभवने अनेक दिग्गजांना उभे हाेऊन अभिनंदन करण्यास भाग पाडले. त्याच्या विस्ाेटक शैलीने जागतिक स्तरावरही अनेक इतिहास रचले. आयपीएलमध्ये कमी चेेंंडूत शतक ठाेकणारा दुसरा तर एका सामन्यात 11 षटकार मारणारा ताे पहिला भारतीय फलंदाज ठरला!
 
आज आयपीएलच्या निमित्ताने वेगवेगळ्या राज्याचे प्रतिनिधित्व करीत असले, तरीही प्रतिभा भारतीय क्रिकेट संघाचे भविष्य आहे, हे नक्की! ज्या वयात तरुणाई माेबाईल आणि Young India Vedha रील्सच्या दुनियेत स्वतःचे समाधान शाेधत असते, त्यावेळी वैभव जागतिक दर्जाचे विक्रम स्थापित करीत असेल तर हा त्याचा आत्मविश्वास म्हणजे जागतिक दर्जाचाच म्हणावा लागेल. पदार्पणातच पहिल्या चेंडूवर षटकार मारून त्याने स्वतःचे ध्येय स्पष्ट केले हाेते. अगदी जे गाेलंदाज अन्य संघातील फलंदाजांची दाणादाण उडवून आपले वर्चस्व सिद्ध करतात, अशा गाेलंदाजांना लीलया षटकार मारून वैभवने आत्मविश्वास, जिद्द आणि मेहनतीच्या जाेरावर अशक्य काहीच नाही, हे सांगण्याचाच प्रयत्न केला आहे.
 
भारतीय क्रिकेटची गाैरवशाली परंपरा आहे. या परंपरेत सचिनपासून सूर्यकुमारपर्यंत अनेक प्रतिभावंतांचा उल्लेख केला जाईल; त्यावेळी वैभव सूर्यवंशी हे नाव घेतल्या वाचून राहणार नाही, हे नक्की! अवघ्या आठव्या वर्गात शिकणा-या वैभवची ही कामगिरी आजच्या फेसबुक, युट्यूब आणि अन्य गाेष्टींमध्ये समाधान शाेधणा-यांसाठी माेठी शिकवण आहे. जिद्दीच्या जाेरावर अशक्य ते शक्य करून दाखविले जाऊ शकते, हेच यातून स्पष्ट हाेते. अपेक्षा एवढीच असेल भारतीय क्रिकेटचे हे ‘वैभव’ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामन्यांमध्ये आपली सूर्यवंशी खेळी दाखविण्यासाठी सज्ज हाेईल, तेव्हा त्याला राजकारण किंवा अन्य अडथळ्यांचा गंध लागू नये. भारतीय क्रिकेटचे हे ‘वैभव’ असेच प्रामाणिकपणे जपले गेले तर हा भारतीय क्रिकेटचा ठेवा वृद्धिंगतच हाेत राहील.
विजय निचकवडे
9763713417