मुंबई,
Manoj Kumar is dead भरत कुमार म्हणजेच अभिनेता मनोज कुमार आता पंचतत्वांमध्ये विलीन झाले आहे. त्यांचा व्हिडिओ स्मशानभूमीतून समोर आला आहे. अभिनेते मनोज कुमार यांच्या पार्थिवावर त्यांचा मोठा मुलगा कुणाल गोस्वामी यांनी अंत्यसंस्कार केले. त्यांच्या अंत्यसंस्कारात २१ तोफांची सलामीही देण्यात आली. मनोज कुमार यांना राजकीय सन्मानाने निरोप देण्यात आला. पोलिस अधिकाऱ्यांनी मनोज कुमारचा मृतदेह स्मशानभूमीत नेला. यावेळी मनोज कुमार यांचा मुलगा आणि नातू सर्व विधी करताना दिसले. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन देखील पवन हंस स्मशानभूमीत पोहोचले. त्यांनी दिवंगत अभिनेते मनोज कुमार यांना अखेरचा निरोप दिला. तर सलीम खान मुलगा अरबाज खानसह मनोज कुमारच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते.