जिओ फायनान्स लिमिटेडचे डिजिटल कर्ज सेवा – ‘लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज’ (LAS) मध्ये पदार्पण
व्याजदर ९.९९% पासून सुरू, फोरक्लोजर चार्जेस नाहीत
मुंबई,
Jio Finance जिओ फायनान्स लिमिटेड (JFL) ने आता लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज (LAS) या क्षेत्रात प्रवेश केला आहे. डीमॅट खात्यात ठेवलेले शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स गहाण ठेवून ग्राहक कर्ज घेऊ शकतात – तेही विक्री न करता. कंपनीचा दावा आहे की ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल, सुरक्षित आणि OTP-आधारित आहे. जिओ फायनान्स अॅपच्या माध्यमातून केवळ १० मिनिटांत १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या NBFC (नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी) शाखेचे नावच आहे – जिओ फायनान्स लिमिटेड (JFL).

कंपनीने या सेवा प्लॅटफॉर्मला डिजिटल-फर्स्ट फायनान्शियल सर्व्हिसेससाठी “वन-स्टॉप डेस्टिनेशन” म्हणून मांडले आहे. ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या सेवा डिझाईन करण्यात आल्या असून त्यात ‘लोन अगेन्स्ट शेअर्स’ आणि ‘लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड्स’ यांचा समावेश आहे. Jio Finance या कर्जांसाठी व्याजदर ग्राहकाच्या वैयक्तिक जोखीम प्रोफाइलनुसार निश्चित केला जाईल. मात्र, कंपनीने हे दर शक्य तितके कमी ठेवण्याचा प्रयत्न केला असून सुरुवातीचा दर ९.९९% आहे. ही कर्जे कमाल तीन वर्षांच्या कालावधीसाठी मिळू शकतात आणि त्यावर कोणतेही फोरक्लोजर शुल्क लागणार नाही.
जिओ फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ कुशल रॉय म्हणाले, “लोन अगेन्स्ट सिक्युरिटीजचा शुभारंभ ही आमच्या व्यापक डिजिटल धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याचा उद्देश ग्राहकांचा फायनान्शियल सर्व्हिसेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आहे. Jio Finance या उपक्रमामुळे फायनान्शियल सर्व्हिसेस अधिक सुलभ, जलद आणि ग्राहक-केंद्रित बनतील, असे आमचे उद्दिष्ट आहे.”
जिओ फायनान्स अॅपद्वारे केवळ लोन अगेन्स्ट सिक्युरिटीजच नाही, तर होम लोन, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी आणि कॉर्पोरेट फायनान्सिंगसुद्धा करता येते. Jio Finance शिवाय, हा अॅप युपीआय पेमेंट्स, मनी ट्रान्सफर, बचत खाती, डिजिटल गोल्ड, विमा सेवा आणि गुंतवणूक पोर्टफोलिओ ट्रॅकिंग यांसारख्या इतर अनेक फायनान्शियल सेवाही प्रदान करतो.