बुलढाणा,
tuberculosis elimination program केंद्र सरकारने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार व निर्देशांकांच्या आधारे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे राज्यस्तरावरून करण्यात आलेल्या मुल्यांकनात बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदवत राज्यातील अव्वल पाच जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवले आहे. सदर मुल्यांकन १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील कामगिरीवर आधारित होते.
या यशामध्ये जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपसंचालक (आरोग्य सेवा) अकोला मंडळ डॉ. सुशिल वाकचौरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे यांनी प्रभावी कामगिरी बजावली.दि. २२ एप्रिल रोजी केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत डॉ. वर्षा श्रीधर गुट्टे यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्याच्या या यशामुळे क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने बुलढाणा जिल्हा ठोस पावले टाकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.