सावधान... तुमचा पण पासवर्ड जन्मतारीख आहे का?

सायबर गुन्हेगारांसाठी सहज लक्ष्य

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
cybercriminals फेसबुकपासून ते ईमेलपर्यंत आणि बँकेच्या एटीएम कार्डपासून ते डिजीटल पेमेंट्सच्या अ‍ॅपपर्यंत प्रत्येक ठिकाणी पासवर्ड टाकून सुरक्षितता बाळगण्यात येते. मात्र, नेहमी लक्षात राहावा किंवा विसरु नये म्हणून अनेक जण आपली जन्मतारीख, जन्मवर्ष, लग्नाची तारीख किंवा मुलाची जन्मतारीख हेच पासवर्ड म्हणून ठेवतात. हीच चूक आपल्या अंगलट येते. सायबर गुन्हेगार याच चुकीचा गैरायदा घेऊन अनेकांचे फेसबुक हॅक करतात तर बँकेतून पैसे लंपास करतात. जन्मतारीख किंवा लग्नाची तारीख पासवर्ड ठेणारे अगदी सहजरित्या सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य ठरत आहेत.
 
 
nagpur
 
सध्या सायबर गुन्हेगारांनी राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात हैदाेस घातला आहे. अनेकांना जाळ्यात ओढून बँक खाते रिकामे करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ हाेत आहे. 2025 मध्ये केवळ एका वर्षात अंदाजे 19,812.96 काेटी रुपये सायबर गुन्हेगारांनी हडप केले तर देशभरात सर्वाधिक फसवणूक महाराष्ट्रात करण्यात आलेली आहे. सायबर गुन्हेगारांच्या अनेक टाेळ्या सक्रिय झाल्या असून दिल्ली, नाेएडा, झारखंड, जामतारा, भरतपूर, मथुरा, मेवात, नूह आणि गुरुग्राम या शहरातून सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक करीत आहेत. cybercriminals एटीएम कार्ड, क्रेडीट कार्ड आणि पेटीएम, गुगल पे, पे झॅप, फोन पे इत्यादी डिजीटल पेमेंट्स अ‍ॅपमुळे आपले आर्थिक व्यवहार सुकर झाले आहेत. अगदी चहाच्या टपरीपासून ते मार्ट-माॅलमधील खरेदीपर्यंत फोनवरून ‘क्युआर काेड’ स्कॅन करुन बील भरताे. मात्र, सायबर गुन्हेगारांनी आता डीजीटल पेमेंट्स अ‍ॅपला लक्ष्य केले आहे. डिजीटल पेमेंट्स अ‍ॅपला चार अंकी किंवा सहा अंकी पासवर्ड ठेवावा लागताे. ताे पासवर्ड अनेक जण आपली जन्मतारीख, जन्मवर्ष, लग्नाची तारीख किंवा मुलाची जन्मतारीख पासवर्ड म्हणून ठेवतात. हीच बाब हेरुन सायबर गुन्हेगार अनेकांच्या खात्यातून पैसे लंपास करीत आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाॅट्सअ‍ॅप, ट्विटर आणि अन्य साेशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी जन्मतारीख अनिवार्य करण्यात आली आहे. अशा अ‍ॅप्समधून सायबर गुन्हेगार कुणाचीही जन्मतारीख मिळवतात. तिच जन्मतारीख पासवर्ड म्हणून वापरणाऱ्यांच्या खात्यातून पैसे लंपास करतात. आतापर्यंत शेकडाे गुन्हे अशाप्रकारे फसवणूक केल्याचे दाखल आहेत.
 
 
सायबर गुन्हेगारांचे काम हाेते साेपे
व्हाॅट्सअपद्वारे माेबाईल हॅक हाेऊ नये किंवा आपल्या माेबाईलचा ताबा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून ‘टू स्टेप व्हेरििफकेशन’ची सुविधा देण्यात आली आहे. cybercriminals यासाठी जवळपास साेपा पासवर्ड वापरणाऱ्यांची माेठी संख्या आहे. 90 टक्के वापरकर्ते हमखास जन्मतारीख किंवा जन्मवर्ष पासवर्ड म्हणून टाकतात. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना माेबाईल हॅक करण्यासाठी आणखी साेपे जाते.
 
 
सर्वाधिक महिला सायबर गुन्हेगारांच्या टार्गेट
सायबर गुन्हेगारांकडून महिलांची सर्वाधिक फसवणूक करण्यात आली आहे. कारण, महिला अनेकदा अगदी सहज आणि साेपा असणारा पासवर्ड एटीएम-क्रेडिट कार्डला ठेवतात. जन्मतारीख, जन्मवर्ष, गाडीचा क्रमांक, लग्नतारीख किंवा स्वतःचे नाव आणि 123 असे अगदी साेपे पासवर्ड ठेवतात. cybercriminals त्यामुळे सायबर गुन्हेगारांच्या रडारवर सर्वाधिक महिला असतात.
 
 
काय करावे...
पासवर्ड ठेवताना किमान 8 ते 15 अक्षरे असलेला सुरक्षित पासवर्ड ठेवावा. यामध्ये अंक, स्पेशल कॅरेक्टर्स आणि चिन्हे आणि अक्षरे ठेवावित. cybercriminals जेणेकरून पासवर्ड पूर्णपणे सुरक्षित राहील. वेळाेवेळी पासवर्ड बदलत राहायला हवे जेणेकरून पासवर्ड हॅक हाेणार नाही. पासवर्डसह दाेन ‘टू स्टेप ऑथेंटिकेशन ीचर’ देखील वापरावे, जेणेकरून तुमचे खाते हॅक हाेण्यापासून वाचवता येईल.
 
 
फोटो आहे अटॅच ई मेल ला
डीजीटल पेमेंट अ‍ॅप किंवा एटीम-क्रेडीट कार्डचा पासवर्ड ठेवताना अगदी सहज आणि साेपा ठेवू नये. बँक अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी कठिण पासवर्ड ठेवा. cybercriminals सायबर गुन्हेगारांना कठिण पासवर्ड मिळविण्यात यश येत नाही. जन्मतारीख, स्वतःचे नाव, जन्मवर्ष आणि गाडीचा क्रमांक हे पासवर्ड ठेवणे टाळावे, जेणेकरुन सुरक्षित डिजीटल व्यवहार करता येईल.
- डाॅ. अर्जून माने (सायबर तज्ञ)