आंबे ताेडणे जीवावर बेतले

झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
Elderly man dies आंबे ताेडण्यासाठी झाडावर चढताना एक 75 वर्षीय वृद्ध ताेल जाऊन खाली पडले. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गिट्टीखदान पाेलिस ठाण्यांतर्गत टीव्ही टाॅवर परिसरात घडली. मधुकर सखाराम नेवारे (वय 75, रा. आयबीएम राेड, कृष्णानगर, सेमिनरी हिल्स) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
 
 
dies
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, नेवारे हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत हाेते. बुधवारी सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास ते टीव्ही टाॅवर परिसरात बसथांब्याजवळील आंब्याच्या झाडावर आंबे ताेडण्यासाठी चढले हाेते. आंबे ताेडत असताना अचानक त्यांचा ताेल गेला आणि ते झाडावरून खाली पडले. Elderly man dies या अपघातात त्यांच्या डाेक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना उपचारासाठी मेयाे रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने उपचार सुरू असतानाच दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घाेषित केले. या प्रकरणी गिट्टीखदान पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.