हिंगणघाट बाजार समितीत १० लाख विंटल कापूस खरेदी

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
हिंगणघाट
Hinganghat cotton market, हंगाम २०२५-२६ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट येथील कापूस मार्केट आवारात २१ एप्रिलपर्यंत १० लाख २६ हजार ०७५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये खाजगी व्यापार्‍यांकडून ८ लाख ७२ हजार ६५२ क्विंटल तर सीसीआयकडून १ लाख ५३ हजार ४२३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.
 

 Hinganghat cotton market, 
बुधवार २२ रोजी सुमारे ४०० वाहनांद्वारे ७ हजार ५०० क्विंटल कापसाची आवक झाली. खुल्या लिलावात खाजगी व्यापार्‍यांकडून चांगल्या प्रतीच्या कापसाला ८४०० ते ८ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. सध्यास्थितीत हंगाम २०२५-२६ मधील कापूस खरेदी अंतिम टप्प्यात आली असून शेतकर्‍यांकडे शिल्लक असलेला कापूस लक्षात घेता साधारणतः १५ मेपर्यंत कापूस आवक सुरू राहण्याची शयता आहे. सध्यास्थितीत समिती आवारात कापसाला मिळत असलेले दर लक्षात घेता आर्थिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने शेतकर्‍यांनी आपला कापूस समितीमध्येच विक्रीकरिता आणावा तसेच कापूस विक्रीकरिता आणताना कापसाच्या प्रतीमध्ये फरक असल्यास त्याचे गुणवत्तेनुसार वर्गीकरण करून हलया प्रतीच्या कापसावर घरूनच वेगळा पडदा टाकून आणावा जेणेकरून लिलावाच्या वेळी चांगल्या व हलया मालाच्या प्रतीनुसार योग्य दर मिळण्यास मदत होईल. मालाचे मोजमाप झाल्यानंतर विक्री मालाची २४ तासाचे आत रकम प्राप्त न झाल्यास तसेच रोख चुकार्‍याकरिता चुकार्‍यामधून आगाऊ रकम कपात करून चुकारा अदा केल्यास त्याबाबत समितीकडे तत्काळ तोंडी किंवा लेखी तक्रार करावी, असे आवाहन समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी केले आहे.