रिसोड,
Siddheshwar Mahadev Kirna Utsav संत श्री अमरदास बाबा मंदिर परिसरातील सिद्धेश्वर महादेवाच्या पिंडीवर दरवर्षी २२ एप्रिल ते २७ एप्रिल पर्यंत सूर्याची किरणे सकाळी ७ वाजता पिंडीवर पडतात हा किरणोत्सव पाहण्यासाठी व सिद्धेश्वर महादेवाचे दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
श्री संत अमरदास मंदिर परिसरामध्ये श्री सिद्धेश्वराचे हेमाडपंथी अतिशय पुरातन मंदिर असून, श्री सिद्धेश्वर महादेव हे जागृत देवस्थान आहे. दररोज दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दर सोमवारी रात्री ९ वाजताच्या आरतीला शहरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात. दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असून, श्री सिद्धेश्वर भगवान ची नगर परिक्रमा निघत असते. २२ एप्रिल ते २७ एप्रिल पर्यंत दररोज सकाळी ७ वाजता सूर्याची किरणे सिद्धेश्वर महादेवाच्या पिंडीवर पडत पडतात हा एक दुर्मिळ योग आहे. तरी किरणोत्सव बघण्यासाठी व सिद्धेश्वर महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री सिद्धेश्वर संस्थान तर्फे करण्यात आले आहे.