नागपूर,
Pension Nagar गुरुदेव सेवा मंडळ, पेन्शन नगर येथे ग्रामजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सामुदायिक ध्यान, रामधून तसेच रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विविध भजन मंडळांनी साईबाबा महिला भजन मंडळ, माऊली भजन मंडळ यांसह हरिपाठ आणि सुंदर कांड सादर करून कार्यक्रमाला धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण केले. दुसऱ्या दिवशी व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकरजी खोडे महाराज यांनी व्यसनमुक्तीवर प्रबोधनपर मार्गदर्शन केले. सायंकाळी डॉ. सचिन काळे महाराज यांचे कीर्तन पार पडले. या निमित्ताने संत तुकडोजी महाराजांच्या मार्ग फलकाचे अनावरणही करण्यात आले.

या कार्यक्रमास परसवाडा येथील नाना महाराज, गुरुदेव सेवा मंडळ मोझरीचे उपसर्वाधिकारी बाबारावजी पाटील, माजी आमदार सुधाकर कोहळे, ज्ञानेश्वर रक्षक, रामराव चोपडे, नरेंद्र राऊत, नगरसेवक शैलेश पांडे, प्रमोद सिंग ठाकूर, ममता मुन्ना ठाकूर, स्नेहल बंडूजी ठाकरे, अमर खोडे, मंजुषा चाचिरकर, अश्विन राऊत, रमेश चोपडे, वैशाली चोपडे, Pension Nagar ॲड. प्रकाश टेकाडे, चंद्रशेखर चौधरी, तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रा. रामदास टेकाडे, गोविंदराव श्रीरामे, रमेश सोनकुसरे, सतीश राईकवार, संजय मोहोड, मधुकर धोटे, मधुकर राऊत, वसंता फरतोडे, दामोदर मामुलकर, डॉ. प्रमोद मेहेश्रे, अरुण राऊत, तेजराम करडे, दिलीप बोदंगुलवार, रामराव डांगोरे, रवी माहुलकर, गुंडेराव ठाकरे, विठ्ठलराव झोड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संजय मोहोड यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश सोनकुसरे यांनी मानले.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र