नागपूर,
Dr. Manibhai Desai Foundation डॉ. मनिभाई देसाई प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा “सर्वोत्कृष्ट महाराष्ट्र राज्य राष्ट्र सेवा पुरस्कार 2026” हा यंदा छंद सम्राट दिलीप डाहाके यांना जाहीर करण्यात आला आहे.दिलीप डाहाके यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, ते पूर्वी नागपूर येथे वास्तव्यास होते व तेथेही त्यांनी सामाजिक कार्यातून आपला ठसा उमटवला आहे.दिलीप डाहाके यांनी आपल्या अनोख्या छंदातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी सुमारे तीन हजार मान्यवरांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या स्वाक्षऱ्या संकलित केल्या असून, त्या छायाचित्रांसह ग्रंथरूपात प्रकाशित केल्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

सध्या पुण्यात “छंद सम्राट सामाजिक संस्था”च्या माध्यमातून ते कार्यरत असून, विविध संग्रहकांना एकत्र आणून उपलब्ध जागांमध्ये युनिक कलेक्शन व कला प्रदर्शनांचे आयोजन करत असतात. Dr. Manibhai Desai Foundation त्यांच्या या सामाजिक व सांस्कृतिक योगदानाची नोंद घेत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रविंद्र भोळे यांनी पत्राद्वारे ही घोषणा केली.या पुरस्काराचे वितरण सोमवार, दि. 27 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे भव्य समारंभात करण्यात येणार आहे.
सौजन्य :ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र