आपल्या अस्तित्वासाठी जैन समाजाने एकजूट व्हावे : ललित गांधी

पुलगाव येथील जैन मंदिरांना भेटी

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
पुलगाव,
Lalit Gandhi शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच समाजाची प्रगती साधून घ्यायची असेल तर एकजुटता आवश्यक आहे. सकल जैन समाजाने एकजूट होऊन एकमेकांना मदत करून व्यवसायामध्ये भरभराट आणली पाहिजे. समाजातील कमजोर वर्गाला मदत करून त्यांना उन्नतीच्या शिखरावर नेले पाहिजे. वर्तमानात समाजाची एकजूट अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र अल्पसंख्यक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी केले.
 
 
Lalit Gandhi
 
शुक्रवार २४ रोजी त्यांनी पुलगाव येथील सर्व जैन मंदिरांना भेट देऊन त्यांनी भगवान महावीर आणि भगवान पार्श्वनाथ यांचे दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम त्यांनी जागाणी निवास परिसरातील जैन मंदिरात दर्शन घेऊन मंदिराच्या देखभालीबाबत चर्चा केली. Lalit Gandhi यावेळी लक्ष्मीचंद जैन, गिरीश जैन, संगीता पासड आणि जैन भत उपस्थित होते. पुलगावच्या प्राचीन आणि सिद्ध खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. यावेळी प्रेमप्रकाश पाटनी यांनी मंदिर परिसराचे अवलोकन करून माहिती दिली. ललित गांधी यांनी येणार्‍या श्रावक आणि दर्शनार्थींबद्दल चौकशी केली. त्यानंतर नवनिर्मित भार्गव जिन मुनिसुव्रतनाथ जैन मंदिराला भेट देऊन मंदिरनिर्मितीचे कौतुक केले.
 
 
जैन दुपट्टा आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शेवटी जैन श्वेतांबर महावीर भवनात समाजाध्यक्ष प्रफुल्ल दर्डा आणि सचिव शुभकरण सुराणा, पवन लुंकड यांनी त्यांचे स्वागत केले. उपस्थित सर्व जैन बांधवांना संबोधित करताना, अल्पसंख्यक जैन महामंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शासकीय सहाय्य कसे मिळवावे आणि जैन समाजाच्या उत्थानासाठी विविध योजनांबद्दल माहिती दिली. Lalit Gandhi यावेळी प्रफुल्ल दर्डा, पियुष दोषी, अनिल पाटनी, ज्ञानचंद कोचर, किशोर बदनोरे उपस्थित होते. कार्यक्रमात मोठ्या संख्येने जैन महिला-पुरुष सहभागी झाले होते. संचालन पल्लवी बदनोरे यांनी केले. स्वागतगीत दीपाली सावळकर यांनी गायले तर आभार पुजा हनुमंते यांनी मानले.