कोराडीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Shivshahi Kabaddi Team कोराडी येथील सेवानंद विद्यालयात भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या नियोजनासाठी शिवशाही कबड्डी संघाचे जिल्हाध्यक्ष संकेत बावनकुडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक उत्साहात पार पडली.

nina 
 
 
या बैठकीस क्रीडा उपसंचालक पल्लवी धात्रक, महानगरपालिका नागपूरचे क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, आदर्श पटले, चेतन खडसे तसेच आशीष फुटाने यांची प्रमुख उपस्थिती होती. Shivshahi Kabaddi Team यावेळी युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.दिनांक ३० एप्रिल ते ५ मे दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील कबड्डी संघ सहभागी होणार असून, खेळाडूंमध्ये चुरशीचे सामने पाहायला मिळणार आहेत. कबड्डी प्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे.स्पर्धेत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कोराडी मंडळाचे अध्यक्ष ब्रह्माजी काळे यांनी केले आहे.
सौजन्य: अशोक माटे,संपर्क मित्र