भोपाळ,
Madhya Pradesh निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी 204 मतदान चिन्हे निश्चित केली असून, आज उमेदवारी अर्ज प्रकि‘या संपल्यानंतर संबंधित उमेदवार आपापल्या मतदारसंघात या चिन्हांवर प्रचार करणार आहे. माहितीनुसार चप्पल, जोडे, मोजे, बिस्किट, फुलकोबी, शिमला मिरची, हिरवी मिरची, पेट्रोल पंप, गळ्यातील टाय यासह एकूण 204 विधानसभा निवडणुकीतील मतदानासंदर्भातील चिन्हे निवडण्यात आली आहे. तर, आतापर्यंत 42 पक्षांना चिन्हांचे वितरण करण्यात आले.
यात राष्ट्रीय सर्वजन विकास पार्टीला पेट्रोल पंप, जनकल्याण पार्टीला द्राक्षे, राष्ट्रीय जनक्रांती पार्टीला लिफाफा, भारतीय बहुजन क्रांतिदलास टीव्ही, जन अधिकार पार्टीला मेणा, भारतीय अवाम ताकत या पक्षाला ब्रश, गोंडवाना गणतंत्र पार्टीला करवत, भारत रक्षक पार्टीला फलंदाज, नागरिक अधिकार शक्तिसेवा पार्टीला टेबल, भारतीय जनसंपर्क पार्टीला फुलकोबी, जनतावादी काँग्रेस पार्टीला फोनचार्जर, अखिल भारतीय हिंद क्रांती पार्टीला बॉटल, संपूर्ण समाज पार्टीला अंगठा मिळणार आहे. Madhya Pradesh दरम्यान, सहा मान्यताप्राप्त पक्षांची चिन्हे कायम असून, यात भाजपा, काँग्रेस, बसपा, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी एम, नॅशनल पीपल्स पार्टीचा समावेश आहे.