मुंबई,
टीव्ही अभिनेत्री नीलू कोहली (Actress Neelu Kohli) यांचे पती हरमिंदरसिंग यांचे निधन झाले. हरमिंदर शुक्रवारी दुपारी गुरुद्वारात गेले होते. गुरुद्वारातून परतल्यानंतर ते बाथरूममध्ये गेले असता तिथे पाय घसरून ते पडले. त्यावेळी घरात केवळ मदतनीसच होता. बराच वेळ बाथरूममधून बाहेर न आल्याने मदतनीस त्यांना पाहण्यासाठी गेला. तेव्हा हरमिंदर बाथरूममध्ये पडलेले दिसले. त्यांना रुग्णालयात नेले तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
वडिलांच्या निधनामुळे माझी आई अभिनेत्री नीलू कोहली (Actress Neelu Kohli) यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची प्रकृती ठीक नाही, असे नीलू कोहलीची मुलगी साहिबा हिने सांगितले. नीलू कोहली यांनी आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केले आहे. त्यांनी हाऊसफुल 2, पटियाला हाऊससह अनेक बॉलिवूड चित्रपट केले आहेत. काही काळापूर्वी त्या जोगी या पीरियड ड्रामा चित्रपटात झळकल्या होत्या. नीलू कोहलीने टीव्ही शोमध्येही आपली छाप सोडली आहे. त्यांनी संगम, मेरे अंगने में, छोटी सरदारनी, मॅडम सर यासार‘या मालिकांमध्ये काम केले आहे.