Thursday, January 9, 2025

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का?

सत्य जाणून घ्या

    दिनांक :22-Dec-2024
Total Views |
Cold water bath आता डिसेंबर महिना सुरु असून, थंडी वाढू लागली आहे. सकाळी लवकर ब्लॅंकेट मधून बाहेर पडावेसे वाटत नाही. या ऋतूत आंघोळ करणे हे सर्वात कठीण काम असल्याचे वाटते. बहुतेक लोक गरम पाण्याने आंघोळ करतात परंतु, काही लोक थंड पाण्याने आंघोळ करतात. तुम्हीही असे करत असाल तर काळजी घ्या. कारण यामुळे, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या तर उद्भवतीलच पण हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. आश्चर्यचकित होऊ नका, हे खरे आहे. हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे, अशा चुका करणे टाळावे. जाणून घेऊया याचे कारण...

 
 
bath
 
 
 
हिवाळ्यात हृदयाचा धोका वाढतो
हिवाळ्यात हृदयाशी Cold water bath संबंधित आजारांचा धोका वाढतो. वास्तविक, थंड वातावरणात शरीर उबदार ठेवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. ज्यांना आधीच हृदयविकाराचा धोका आहे त्यांच्यासाठी हे अधिक धोकादायक आहे. पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे सूचित केले आहे की, जर एखाद्याला आधीच हृदयविकाराचा त्रास असेल तर त्यांना थंड हवामानात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ३१% वाढतो. अशा स्थितीत या ऋतूत हृदयाची अतिरिक्त काळजी घेण्याची गरज आहे. थंड पाण्याने आंघोळ करण्याची चूक कधीही करू नये.

 
थंड पाण्याने आंघोळ हृदयासाठी धोकादायक का आहे?
थंड पाणी Cold water bath सुरक्षित असते, असे अनेकदा ऐकायला मिळते, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. याने आंघोळ केल्याने तणाव दूर होतो आणि शरीर सक्रिय होते. तथापि, याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. उलट, त्याने गंभीर नुकसान होऊ शकते. जर एखाद्याला उच्च रक्तदाब, मधुमेहाची समस्या असेल किंवा त्याला कधी ब्रेन स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका आला असेल, तर त्यांच्यासाठी थंड पाण्याने अंघोळ करणे धोकादायक ठरू शकते. यामुळे, हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो.
 
थंड पाण्याने अंघोळ केल्याने हृदयविकाराचा झटका कसा येऊ शकतो ?
आरोग्य तज्ज्ञांचे Cold water bath म्हणणे आहे की, थंड पाण्यामुळे अचानक रक्तदाब वाढू शकतो. ज्यामुळे, रक्त प्रवाह कमी होतो आणि रक्तवाहिन्या अरुंद होतात. जर चरबीमुळे रक्तवाहिन्या आधीच अरुंद झाल्या असतील तर थंड पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर त्या अरुंद होतात, ज्यामुळे ब्रेन स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे, हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करण्याची चूक करू नका.